जाहिरात

जालन्यात दहशत! हॉटेलसमोर लिंबू, बाहुल्या, चिठ्ठ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांची नावं; काळ्या जादूनं गावं हादरलं

जालन्यात दहशत! हॉटेलसमोर हळदकुंकू, बाहुल्या, चिठ्ठ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांची नावं; काळ्या जादूनं गावं हादरलं

जालन्यात दहशत! हॉटेलसमोर लिंबू, बाहुल्या, चिठ्ठ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांची नावं; काळ्या जादूनं गावं हादरलं
"Jalna Black Magic News: जालन्यामध्ये काळ्या जादूचा प्रकार"
  • जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शिवनेरी हॉटेलसमोर एका अज्ञात महिलेने उघडपणे काळी जादू केल्याची माहिती
  • हॉटेलसमोर हळद, कुंकू, लिंबू, बाहुली, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस कर्मचाऱ्यांची नावे चिठ्ठ्यांमध्ये आढळली
  • 30 जानेवारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

- पूजा भारद्वाज, प्रतिनिधी

Jalna Black Magic News: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर उघडपणे कथित स्वरुपात काळी जादू केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. संपूर्ण प्रकार जावखेडा ठोंबरे गावातील 'शिवनेरी हॉटेल' येथे घडला आहे. व्हिडीओमध्ये चेहरा झाकलेली एक महिला दिसत आहे. घटनास्थळी हळद, कुंकू, लिंबू, बाहुली तसेच काही संशयास्पद साहित्य आढळून आलंय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील प्रतिष्ठित नागरिकांची तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावं लिहिलेल्या अनेक चिठ्ठ्याही सापडल्या आहेत. 30 जानेवारी रोजी ही घटना घडलीय. या घटनेमुळे गावात दहशत आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

(नक्की वाचा : Latur News: एकाच खोलीत मायलेकी 2 वर्षे कैदेत! लातूरमधील घटनेने महाराष्ट्र हादरला, अमानवी कृत्य उघड)

हॉटेलबाहेर आढळलं संशयास्पद साहित्य

घटनेचा सविस्तर तपशील पाहता, हॉटेलचे मालक कृष्णा भानुदास ठोंबरे यांनी नेहमीप्रमाणे 30 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता हॉटेल बंद केले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी कामावर आले असता, हॉटेलच्या मुख्य दरवाज्या समोरील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. हॉटेलसमोर हळद, कुंकू, लिंबू, बाहुली आणि काही संशयास्पद साहित्य पडलेले होते. त्याहूनही अधिक धक्कादायक बाब म्हणजे तेथे गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावे लिहिलेल्या अनेक चिठ्ठ्या आढळून आल्या.

(नक्की वाचा : Viral Video: पुण्यात भररस्त्यात रक्तरंजित राडा! मैत्रिणीला फोन केला म्हणून मित्रावरच केले कोयत्यानं सपासप वार)

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलं भयानक कृत्य

प्रकरण संशयास्पद वाटल्याने हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आणि संपूर्ण सत्य समोर आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की, एक अज्ञात महिला ऑटो-रिक्षातून हॉटेलबाहेर पोहोचली. तिने आपली ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. संबंधित महिला हॉटेलसमोर लिंबू, हळद-कुंकू यासारख्या गोष्टी ठेवताना दिसत आहे. या घटनेनंतर हॉटेल मालक कृष्णा ठोंबरे यांनी तातडीने भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेची ओळख पटवून तिचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करतायेत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com