Dombivli News: 'लाज वाटली पाहिजे..', डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजू पाटील संतापले, भाजपचा बडा नेता टार्गेटवर

मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन रुग्णालयातील सुविधा आणि व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.

जाहिरात
Read Time: 3 mins
Raju Patil On Ravindra Chavan

Raju Patil On Ravindra Chavan : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन रुग्णालयातील सुविधा आणि व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. एकीकडे, शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चौघांनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

'रुग्णालयाच्या अशा अवस्थेला जबाबदार कोण?'

या संपूर्ण प्रकरणावर आता राजकारण सुरू झाले आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. या प्रकरणावर बोलताना राजू पाटील म्हणाले, "रमेश म्हात्रे यांनी केलेल्या कृत्याचे आम्ही कोणत्याही परिस्थितीत समर्थन करत नाही. मात्र, त्या दिवशी एखाद्या महिलेच्या नातेवाईकांकडून अशी प्रतिक्रिया आली असती तर काय झाले असते, याचाही विचार झाला पाहिजे. रुग्णालयात आवश्यक सोयी-सुविधा मिळत नाहीत. या रुग्णालयाची अशी अवस्था होण्यास जबाबदार कोण?".

Advertisement

नक्की वाचा >> Buldhana News:फक्त बोथा जंगलच नव्हे, आता तर 'या' परिसरातही हिंसक प्राण्यांचा वावर, वन विभागाने केलं मोठं आवाहन

राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत म्हटले, "गेली 30 वर्षे या शहरात सत्ता असलेल्यांनी नेमके काय केले? रवींद्र चव्हाण चार वेळा आमदार राहिले, वैद्यकीय शिक्षण मंत्रीही होते. त्यांनी या रुग्णालयासाठी काय केले? सहा दिवस पाऊस होता, आज रवी दिसला पण आमच्या डोंबिवलीचा 'रवी' कुठेच दिसला नाही." ते पुढे म्हणाले, "आम्ही केडीएमसीमध्ये सत्तेत येऊन अवघे सहा महिने झाले आहेत, तरी आम्हालाच प्रश्न विचारले जातात. जे लोक 30 वर्षे सत्तेत होते, त्यांना प्रश्न का विचारले जात नाहीत? आम्हाला पाच वर्षे काम करू द्या, त्यानंतर आमचा जाब विचारा."

नक्की वाचा >> Pune News: मोशी दुर्घटना, 40 तास उलटले, 'त्या' लोकांचा श्वास अजूनही कोंडलेलाच, रेस्क्यू टीमने आखलाय मोठा प्लॅन

डोंबिवलीचा 'रवी' कुठेच दिसला नाही

डोंबिवलीतील नागरी सुविधांवरही त्यांनी टीका केली. "डोंबिवलीच्या मध्यभागी पोस्टमार्टम कक्ष आणून ठेवला आहे. रामनगर येथील स्मशानभूमी स्थलांतरित करण्याची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करत आहोत. जी गोष्टी शहराच्या बाहेर गेली पाहिजे ती शहरात आणतात आणि जी शहरात पाहिजे ती शहरात येत नाही. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. शहरासाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत. हा संपूर्ण अनागोंदी कारभार असून त्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार आहे, मारहाणीच्या घटनेचा उल्लेख करताना राजू पाटील म्हणाले, "रमेश म्हात्रे यांनी जे केले ते चुकीचेच आहे. मात्र, त्या घटनेमागे लोकांच्या मनात साचलेला संताप आणि रुग्णालयातील व्यवस्थेविषयीचा रोष याचाही विचार झाला पाहिजे. लोकांच्या उद्रेकामागची कारणे समजून घेण्याची गरज आहे."