अमजद खान, प्रतिनिधी
Kalyan Crime News Today : ऐन निवडणुकीच्या तोंडावर कल्याण शहरात सर्वात भयंकर घटना घडली आहे. कौंटुबीक संपत्तीच्या वादातून सासूने मित्राच्या मदतीने सुनेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. रूपाली विलास गांगुर्डे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे.तर लताबाई गांगुर्डे आणि जगदीश म्हात्रे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपी लताबाई आणि तिचा मित्र जगदीश म्हात्रे या दोघांनी मिळून 1 जानेवारीला रुपालीची राहत्या घरी लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केली होती. रुपालीचा मृतदेह वालधुनी पुलाखाली फेकून दिला होता. त्यानंतर महात्मा फुले पोलिसांनी तांत्रिक मदतीने तपासाचा वेग वाढवला आणि 24 तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
रुपालीला 9 ते 10 लाख रुपयांची ग्रुच्युएटी मिळाली अन्..
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लताबाई नाथा गांगुर्डे या महिलेनं तिची सून रूपाली विलास गांगुर्डे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करताच धक्कादायक माहिती समोर आली. कारण त्यांच्याकडे असलेल्या फोटोवरून तो मृतदेह रुपालीचाच असल्याचं स्पष्ट झालं.रूपालीचा पती विलास गांगुर्डे रेल्वेत नोकरी करायचा.
नक्की वाचा >> भारतीय तरुणीने कोरियाच्या बॉयफ्रेंडला संपवलं! दारू पार्टीत घडला भयंकर प्रकार, पोलिसांनाही बसला हादरा!
पण काही महिन्यांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रुपालीला जवळपास 9 ते 10 लाख रुपयांची ग्रुच्युएटी मिळाली होती. पण या पैशांवर तिच्या सासूचा डोळा होता. सासूने रुपालीकडे पैशांची मागणी केली असता तिने नकार दिला. त्यानंतर सासूने अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी स्वत:अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांच्यातील वाद अधिक वाढला.
नक्की वाचा >> KDMC Election कल्याण-डोंबिवली महायुतीतील बंडखोर अन् पक्षविरोधी कार्यकर्ते कोण? 55 ते 60 जणांची यादीच आली समोर
त्यानंतर रागाच्या भरात लताबाई गांगुर्डे आणि तिचा मित्र जगदीश म्हात्रे यांनी रूपालीच्या डोक्यावर,चेहऱ्यावर व हातावर लोखंडी रॉडने वार केले. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह वालधुनी पुलाखाली फेकून दिला आणि पोलिसांत रुपाली बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पण महात्मा फुले पोलिसांनी तांत्रिक मदतीने सखोल तपास केला आणि या हत्येचा फक्त 24 तासांतच उलगडा केला आणि दोन्ही आरोपींना अटक केली.