अमजद खान, प्रतिनिधी
KDMC Election Shivsena-BJP News : कल्याण-डोंबिवलीत महायुतीतील शिवसेना शिंदे गट-भाजप एकत्र निवडणूक लढत आहेत. निवडणुकीत अनेक जण इच्छुक होते.परंतु,शिवसेना भाजपा नेत्यांनी बहुतांश इच्छूक नेत्यांना अर्ज मागे घ्यायला लावला.पण अजूनही काही बंडखोर आहेत,ज्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. असेही काही कार्यकर्ते आहेत जे पक्षात राहून पक्षविरोधी काम करत आहेत.अशा लोकांची एक यादीच तयार करून शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आली आहे.या सर्व कार्यकर्त्यांबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील,असं विधान शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी केले आहे. कल्याण डोंबिवलीत शिवसेना-भाजपामध्ये 55 ते 60 कार्यकर्ते असे आहेत, जे बंडखोरी करून निवडणूक लढवत आहेत. तसच काही जण पक्षात राहून पक्षविरोधी काम करत असल्याची माहिती समोर आलीय.
त्या कार्यकर्त्यांची नावं आली समोर
यादीमधील काही नावं उघडकीस आली आहेत. ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये साधना गायकर या भाजपच्या बंडखोर आहेत .प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे अर्जुन मात्रे यांनी बंडखोरी केलीय. मोहन कोणकर हे प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपाचे बंडखोर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी विजय देवशेकर यांचा पत्नीने प्रभाग क्रमांक 3 मध्ये बंडखोरी केली आहे. भाजपाच्या बुधाराम सरनोबत यांच्या पत्नीने देखील प्रभाग क्रमांक 3 मध्ये बंडखोरी केली आहे. एवढेच नाही तर काही प्रभागात भाजपाचे सचिन यादुडे, मोरेश्वर तरे, सुधीर वायले, नीता देसले, यांच्यासह 57 कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.आता महायुतीतील दोन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा >> Devendra Fadnavis: "अकोल्यातील लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज...", प्रचारसभेत CM फडणवीसांचं सर्वात मोठं विधान!
शिवसेना भाजप 122 जागांवर निवडणूक लढवणार होती, पण..
कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप 122 जागांवर निवडणूक लढवणार होती. यामध्ये शिवसेना शिंदे गट 68 तर भाजपा 54 जागांवर शिवसेना-भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पण मतदानाआधीच केडीएमसीत 20 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले.त्यामुळे शिवसेना भाजपाचे 122 जागांपैकी फक्त 102 जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
नक्की वाचा >> ठाकरे-पवार बंधूंचं मनोमिलन की राजकीय 'ब्रँड' वाचवण्याची केविलवाणी धडपड? वाचा INSIDE STORY
या 102 ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरले होते.कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील आणि भाजपाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरांना शांत केलं.अनेकांनी माघार घेतली आणि पक्षाचे काम सुरू केलं. मात्र आताही कल्याण डोंबिवलीत काही बंडखोर आणि पक्षांमध्ये राहून पक्षविरोधी काम करीत असल्याची माहिती शिवसेना शिंदे गट आणि भाजप नेत्यांना मिळाली आहे.महायुतीतील नेत्यांनी बंडखोर आणि पक्षविरोधी काम करणाऱ्या लोकांची यादी तयार केली आहे.ही यादी शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा पक्षश्रेष्ठीला पाठवण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world