जाहिरात

MP Crime: लिव्ह इन पार्टनरची हत्या, तब्बल 10 महिने मृतदेह फ्रीजमध्ये; भयंकर हत्याकांडाची Inside स्टोरी

हत्येनंतर तब्बल सहा महिने तिचा मृतदेह फ्रीजमध्ये होता. सहा महिन्यांनी फ्रीज बंद होऊन दुर्गंधी पसरल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

MP Crime:  लिव्ह इन पार्टनरची हत्या, तब्बल 10 महिने मृतदेह फ्रीजमध्ये; भयंकर हत्याकांडाची Inside स्टोरी

मध्यप्रदेश: दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरुन गेला होता. अशीच भयंकर आणि क्रृर हत्येची आणखी एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये एका तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरने निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर या तरुणीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. आता तब्बल दहा महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आले आहे. 

लिव्ह-इन रिलेशनशिपचा आणखी एक भयानक परिणाम समोर आला आहे. मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका तरुणाने आपल्या लिव्ह इन प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हत्येनंतर तब्बल दहा महिने तिचा मृतदेह फ्रीजमध्ये होता. दहा महिन्यांनी फ्रीज बंद होऊन दुर्गंधी पसरल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या खोलीत मृतदेह ठेवण्यात आला होता त्याच्या शेजारीच दुसऱ्या भाडेकरूचे कुटुंब राहते, परंतु आतापर्यंत कोणालाही याची कल्पना आली नाही. पिंकी उर्फ ​​प्रतिभा प्रजापती असे या हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून पोलिसांनी तिचा प्रियकर संजय पाटीदार याला अटक केली आहे. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. 

अशी उघडकीस आली घटना..

 व्यापारी धीरेंद्र श्रीवास्तव यांचे देवास येथील वृंदावन धाम येथे दोन मजली घर आहे. ते सहा महिन्यांपासून दुबईत आहेत.  गेल्या वर्षी जुलैमध्ये बलवीर राजपूत नावाच्या व्यक्तीने तळमजला भाड्याने घेतला होता. पण त्याला आधी भाडेकरू असलेल्या संजय पाटीदारने कुलूप लावल्याने दोन खोल्या वापरता येत नव्हत्या. पाटीदारने जूनमध्येच फ्लॅट रिकामा केला होता, परंतु रेफ्रिजरेटरसह काही वस्तू दोन खोल्यांमध्ये बंद करून ठेवल्या होत्या. तो घरमालकाला फोनवरून  तो लवकरच त्याचे सामान परत घेण्यासाठी येईल, असं सांगत होता.

मात्र  दुसऱ्या भाडेकरुला त्या खोल्या हव्या होत्या, म्हणून त्याने घरमालकाशी बोलले. घरमालकाने त्याला कुलूप तोडून खोली वापरण्यास सांगितले. गुरुवारी संध्याकाळी बलवीरने कुलूप तोडले तेव्हा त्याला फ्रीज अजूनही चालू असल्याचे आढळले जो त्याने बंद केला. त्यानंतर  शुक्रवारी सकाळी खोलीतून असह्य वास येऊ लागल्याने हा प्रकार उघड झाला. 

(नक्की वाचा -  CIDCO Lottery : सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर, 25 लाखांपासून मिळणार स्वप्नांचं घर, अर्जाची अंतिम मुदत कधीपर्यंत?)

आरोपीची कबुली

चौकशीदरम्यान, पाटीदारने सांगितले की तो प्रतिभासोबत पाच वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. पण प्रतिभा त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती. , हत्येच्या दिवशीही त्यांच्यामध्ये यावरुनच मोठा वाद झाला. त्याने प्रतिभाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकत नव्हती म्हणून त्याने तिचा गळा दाबून खून केला

आरोपीने सांगितले की,  त्याने त्याचा साथीदार विनोद दवे सोबत मिळून हा गुन्हा केला. वास येऊ नये म्हणून त्याने मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला आणि हाय मोडवर ठेवला. विनोद दुसऱ्या एका गुन्हेगारी प्रकरणात राजस्थानच्या तुरुंगात आहे. पोलिस त्याची चौकशी करण्याचीही तयारी करत आहेत. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com