जाहिरात

Saquib Nachan : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचनवर आज अंत्यसंस्कार; बोरीवली-पडघा गावाला छावणीचे स्वरूप

काही महिन्यांपूर्वी झालेल्या हेरगिरी प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला होता. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या घरावर छापा टाकण्यात आला होता. यात बोरिवलीतील अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्याचा हेतू होता.

Saquib Nachan : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचनवर आज अंत्यसंस्कार; बोरीवली-पडघा गावाला छावणीचे स्वरूप

भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गावातील रहिवासी आणि बॉम्बस्फोटांसह दहशतवादी गुन्ह्यातील आरोपी साकिब नाचन याचा मृत्यू झाला आहे. नाचन तिहार तुरुंगात होता. चार पाच दिवसांपूर्वी त्याची प्रकृती बिघडली होती. मेंदूत रक्तस्राव झाल्याने साकिबला दिल्लीतील दीनदयाळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गावचा रहिवासी साकिब नाचन हा मुंबई सेंट्रल, विलेपार्ले, मुलुंड रेल्वे स्थानकांवर झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी होता. साकिबला दहशतवादी प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होते. त्यामुळे 2003 च्या बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. 2017 मध्ये शिक्षा भोगल्यानंतर तो पुन्हा कट्टरतावाद्यांमध्ये सामील झाला. 2023 मध्ये पुन्हा साकिबला आयसीआयएस मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आली.

Crime : 'हेरिटेज योगा सेंटर'मध्ये सेक्स अन् ड्रग्जचे वर्ग; प्रसिद्ध योग बाबाच्या आश्रमात छापा

नक्की वाचा - Crime : 'हेरिटेज योगा सेंटर'मध्ये सेक्स अन् ड्रग्जचे वर्ग; प्रसिद्ध योग बाबाच्या आश्रमात छापा

काही महिन्यांपूर्वी झालेल्या हेरगिरी प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला होता. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या घरावर छापा टाकण्यात आला होता. यात बोरिवलीतील अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्याचा हेतू होता. साकिब हा बंदी घालण्यात आलेल्या सिमी (सिमी) या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. साकिब नाचनवर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते आणि तो बराच काळ तुरुंगात होता. अलिकडेच त्याची प्रकृती बिघडल्यानंतर तिहार तुरुंग प्रशासनाने त्याला उपचारासाठी दीनदयाळ रुग्णालयात नेले. तेथे‌ उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

त्याचे पार्थिव रात्री उशिरा त्याच्या मूळ गावी बोरिवली येथे आणण्यात आले. येथे कुटुंबातील सदस्य आणि स्थानिक लोक उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने गावात व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पोलीस दलाच्या तैनाती सोबतच स्थानिक गुप्तचर संस्था देखील सतर्क आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पडघा टोल‌ नाका ते बोरीवली सीएनजी पेट्रोल पंपापर्यंत सर्व धाबे व दुकानं बंद करण्यात आली होती. साकिब नाचन याच्यावर आज ३० जून रोजी त्याच्या बोरिवली गावात अंत्यसंस्कार केले जातील आणि त्याला गावातीलच स्मशानभूमीत दफन केले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com