- पाकिस्तान की खुफिया एजेंसी ISI ने 14 से 17 साल के नाबालिगों को जाल में फंसाकर टीनएज स्पाई नेटवर्क बनाया है.
- पठानकोट पुलिस ने 15 साल के एक लड़के को गिरफ्तार कर इस नेटवर्क का खुलासा किया और कई किशोरों की पहचान की है.
- गिरफ्तार लड़के के फोन को ISI ने हैक कर लिया था और ऑनलाइन माध्यमों से बच्चों को ब्रेनवॉश किया जा रहा है.
व्हाइट कॉलर दहशतवादानंतर आता सुरक्षा एजन्सीसमोर एक मोठं आव्हान आहे. टीनएच स्पाय नेटवर्क आता नवं आव्हान आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने १४ ते १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे.
सुरक्षा एजन्सीच्या तपासानुसार, ३७ हून अधिक अल्पवयीन मुलं पाकिस्तानच्या नेटवर्कचा भाग आहे. यामध्ये १२ पंजाब आणि हरियाणातील आहेत. जवळजवळ २५ मुलं जम्मू-काश्मीरचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे.
कसा झाला हा खुलासा?
दोन दिवसांपूर्वी पठाणकोट पोलिसांनी १५ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाला अटक केलं. त्याच्या मोबाइलची तपासणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. आयएसआय अनेक किशोरवयीन मुलांकडून ऑनलाइन माध्यमातून आणि अनकन्वेंशन Apps च्या माध्यमातून ब्रेनवॉश करीत स्वत:चं काम करवून घेत आहेत. याअंतर्गत सुरक्षा ठिकाणांचे फोटो काढणे, सुरक्षा दलाच्या हालचाली आणि ताफ्याबाबत माहिती देणं आणि दहशतवादी संघटनांसाठी लॉजिस्टिक पाठिंबा मिळण्यासारखी कामं या मुलांकडून करवून घेतली जात आहेत.
ISI कडून फोन हॅक...
पठानकोटमध्ये अटक केलेल्या मुलाच्या फोन पाक हँडलर्सनी क्लोन केला होता. त्याला एक लिंक पाठवण्यात आली होती, जी क्लिक करताच त्याचा फोन पूर्णपणे हॅक झाला आणि त्यातील सर्व डेटा आयएसआय ऑपरेटिव्हकडे पोहोचला. या प्रकरणात पठाणकोट एसएसपी दलजिंदर सिंह ढिल्लो म्हणाले, तपास सुरू आहे आणि अनेक हैराण करणारे तथ्य समोर येत आहेत.
आयएसआयचा कट उघडकीस...
देशभरात सुरक्षा एजन्सी आता सतर्क झाल्या आहेत. विशेषतः सीमावर्ती भागात किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर ठेवून आहेत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ही आयएसआयची एक नवीन युक्ती आहे, ज्यामध्ये लहान मुले सहजपणे अडकू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
