Navi Mumbai Crime: घराबाहेर पडल्या त्या परतल्याच नाहीत.. 4 मुलींसोबत काय घडलं? मुंबईत खळबळ

एकूण चार मुली बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. संबंधित मुली घराबाहेर पडल्यानंतर परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यांत धाव घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Navi Mumbai Girl Missing Case:  राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरु आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात महिला बेपत्ता होण्याचं प्रमाणही वाढले आहे. मुंबईसह राज्यभरातून महिला- मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आकडेवारीही समोर येत आहे. अशातच आता नवी मुंबईतून चार मुली बेपत्ता झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

नेमकं काय घडलं? 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबईतून चार मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे.  रबाळे, एपीएमसी आणि कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण चार मुली बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. संबंधित मुली घराबाहेर पडल्यानंतर परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यांत धाव घेतली.

Crime News: प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेंडवर पैसे उधळण्यासाठी डेंजर प्लॅन, पोलिसही हादरले, शहरात खळबळ

मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भा.द.वि. कलम 363 अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ शोधमोहिम सुरू केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, मित्रपरिवाराशी चौकशी, तसेच संभाव्य संशयितांची माहिती तपासण्यात येत आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत. 

Amravati News: पोलीस भरतीच्या सरावात खोळंबा; अमरावती ग्रामीण पोलिसांचा मोठा निर्णय

अकोल्यातील हरवलेली मुलगी सापडली...

दरम्यान, अकोला सिटी कोतवाली येथे 2 ऑगस्ट रोजी 8 वर्षांच्या बालिकेच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणी कलम 137 बीएनएसप्रमाणे तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय गवई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने इटारसी-खंडवा येथे शोध मोहीम राबवली. अकोला चाईल्ड लाईनकडून बालिका नागपूर बालगृहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत बालिकेला ताब्यात घेतले आणि शोध यशस्वी केला.

Advertisement
Topics mentioned in this article