Mumbai Crime : Shocking! वांद्रे टर्मिनसवरील रेल्वेच्या रिकाम्या डब्यात महिलेचं लैंगिक शोषण

वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात एका 55 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Bandra Railway Terminus : वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात एका 55 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवार आणि रविवार मध्यरात्री (Mumbai crime) हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) रविवारी सकाळी आरोपीला अटक केले.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मूळची उत्तर भारतातील असलेली ही महिला आपल्या मुलासोबत मुंबईत फिरण्यासाठी आली होती. मुंबईतील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना शहरभर फिरवलं. पण त्यांना रात्रभर झोपण्यासाठी जागा मिळू शकली नाही. त्यामुळे महिला तिच्या मुलासह वांद्रे टर्मिनस येथे झोपले. ते प्लॅटफॉर्म 6/7 वर गेले. जिथे कोणच नव्हतं.  

नक्की वाचा - Crime News: कला शिक्षकाची भलतीच कला! महिलांच्या वॉशरुममध्ये जायचा अन्...

प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेच्या रिकाम्या डब्यात महिलेवर बलात्कार करण्यात आला. मात्र आरोपीने पीडितेला रिकाम्या ट्रेनमध्ये कसं नेलं? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी टर्मिनसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी हा पुन्हा वांद्रे टर्मिनसमध्ये दाखल झाला होता. आरोपीला पहाटे 5 वाजता त्याच रिकाम्या ट्रेनमधून ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी फूटपाथवर राहतो. तसेच त्याने आपले नाव राहुल शेख असल्याचं सांगितलं.  दरम्यान पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे