
मुंबई: एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या एका कर्मचाऱ्याला सोन्याच्या तस्करीच्या सिंडिकेटचा भाग असल्याच्या संशयावरून मुंबई शहर विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या कर्मचाऱ्याने तस्करीसाठी शोधलेली आयडिया पाहून पोलिसही चक्रावून गेले. काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर..
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या एका कर्मचाऱ्याला सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या कर्मचाऱ्याने सोने लपवण्यासाठी चक्क तीन अंडरवेअर घातल्या होत्या आणि त्यामधून तो सोन्याची तस्करी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
मंगळवारी रात्री तपासणीदरम्यान आलेल्या संशयाच्या आधारे कस्टम विभागातील अधिकाऱ्यांनी टी- 2 टर्मिनलच्या प्रस्थान क्षेत्रात ग्राहक सेवा कार्यकारी मयूर कोराडे (वय, 31) याला अटक केली. अधिकाऱ्यांनी वैयक्तिक तपासणी केली आणि त्याने तीन अंडरवेअर घातलेले आढळले. त्यामुळेच त्याच्याबाबत तपास अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर सतत चौकशी केल्यानंतर त्याने विमानतळाबाहेर ट्रान्झिट प्रवाशांकडून तस्करी केलेले सोने वाहून नेल्याचे कबूल केले.
नक्की वाचा - Sharad Pawar: एकनाथ शिंदेंचे कौतूक करताना शरद पवारांची गुगली, मात्र दिल्लीतलं वातावरण तापलं
त्याला यूएईहून कोलंबोला ट्रान्झिटमध्ये येणाऱ्या एका ट्रान्झिट प्रवाशाकडून सोने मिळणार होते, अशी कबुली त्याने दिली. त्याच्या मदतीने आम्ही सोने देणाऱ्या प्रवाशालाही पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नसल्याचे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, कस्टम्सने कोराडेवर सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांकडून सोन्याची बेकायदेशीर वाहतूक सुलभ केल्याचा आरोप आहे. मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याचे वकील आफताब कुरेशीने याला जोरदार विराध केला. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world