- ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai Crime News: मुंबईच्या पोलीस दलात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मालाड येथील कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior PI) संजीव तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) ज्ञानेश्वर जुन्ने यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईनंतर जेव्हा वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनची झाडाझडती घेण्यात आली, तेव्हा तिथे तब्बल 6 लाख 34 हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? | ACB Action In Mumbai
गुरुवारी (19 फेब्रुवारी 2026) रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior PI) संजीव तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) ज्ञानेश्वर जुन्ने यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं गेले. यानंतर दोघांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.
(नक्की वाचा: Baba Bangali Arrested: मुंबई लोकलमधील बाबा बंगालीचा पर्दाफाश, वशीकरण-प्रेमविवाहाचा दावा अंगलट, पोलिसांची कारवाई)
केबिनमध्ये सापडले घबाड
अटकेनंतर एसीबीच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांच्या केबिनची कसून झडती घेतली. या झडतीदरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्यांना केबिनमध्ये 6 लाख 34 हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. ही रक्कम नेमकी कुठून आली आणि कशासाठी ठेवण्यात आली होती, याचा तपास घेतला जातोय.
23 फेब्रुवारीपर्यंत ACB कोठडीवरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior PI) संजीव तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) ज्ञानेश्वर जुन्ने दोघांना 23 फेब्रुवारीपर्यंत एसीबी कोठडी सुनावण्यात आलीय. या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्ट चेहऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे, प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण आहे.