Mumbai News : असं म्हणतात भारतात कित्येक शतकांपूर्वी सोन्याचा धूर निघत होता. याचा अर्थ आपला देश अत्यंत संपन्न असा होता. मात्र मुंबईत प्रत्यक्षात एका घरातून सोन्याचा धूर निघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत हा भयानक प्रकार सुरू होता. (Smuggling gold smelting factory in Mumbai)
१५ कोटींच्या विटा जप्त...
तस्करीद्वारे देशात येणारं सोनं मुंबईतील एका घरात वितवण्याचं काम सुरू असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील एका घरात या तस्करीच्या सोन्यापासून सोन्याच्या विटा आणि पावडर तयार केली जात होती. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी हा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. चार ठिकाणी छापेमारी करीत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय १५ कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. याशिवाय अधिकाऱ्यांनी सोनं वितवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भट्ट्या त्याशिवाय बार किंवा विटा तयार करण्यासाठीचं साहित्य जप्त केलं आहे. याशिवाय आणखी कुठे कुठे असे कारखाने सुरू आहेत, याचाही शोध घेतला जात आहे.
नक्की वाचा - Mumbai Local : मुंबई लोकलचा चेहरामोहरा बदलणार! 27 स्थानके होणार 15 डब्यांसाठी सज्ज; तुमचं स्टेशन आहे का?
सोन्याच्या तस्करीचं वाढतं प्रमाण...
गेल्या काही वर्षात सोन्याच्या तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. परिणामी विमानतळावरही मोठ्या संख्येने सोन्याची तस्करी केली जाते.