Cyber Crime : 'सुंदरी'चा फोटो दिसला अन् 3 मिनिटात बँक खातं रिकामं; ऑनलाइन लुटीची नवी क्लृप्ती, अलर्ट राहा!

रस्त्यालगत बसणारी भाजीवालीदेखील डिजिटल झालीये. मात्र सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai cyber Crime : देशभरात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार वाढला आहे. अगदी रस्त्यालगत बसणारी भाजीवालीदेखील डिजिटल झालीये. मात्र सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 

फ्री ऑफर, कॅशबॅकवर बळी पडू नका...

एखादा फोटो पाठवून त्याखाली मालवेअर किंवा व्हायरसद्वारे मोबाइलचा ताबा घेतला जातो आणि बँक अकाऊंट रिकामं केलं जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.  चुनाभट्टी येथील एका व्यावसायिकाचं खातं अशाच प्रकारे रिकामं झालं. त्यांच्या मोबाइलवर एका सुंदरीचा फोटो पाठविण्यात आला होता. अवघ्या तीन मिनिटात या व्यावसायिकाचे बँक अकाऊंट रिकामं झालं. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, एसएमएस, ई-मेलद्वारे आलेल्या एपीके फाइल्समध्ये बिघाड असू शकतो. यातून तुमच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. फ्री ऑफर, कॅशबॅकवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 

नक्की वाचा - Police Recruitment : महाराष्ट्र पोलिसात बंपर भरती; अर्ज करण्याची मुदत वाढवली, 50 हजारांहून अधिक पगार!

'सुंदरीचा फोटो पाठवला आहे....'

१४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील एका व्यावसायिकाला अनोळखी नंबरवरुन फोन आला होता. 'आपको एक लडकी का फोटो भेजा है, चाहिये तो पैसे भेजो' असं समोरील व्यक्तीने व्यावसायिकाला सांगितलं. व्यावसायिकाने फोन कट केला. काही वेळात व्हॉट्सअॅपवर एका सुंदर मुलीचा फोटो आणि मेसेज आला. काही वेळाने मोबाइलवर ओटीपी आला. व्यावसायिकाने बँकेच्या ग्राहक मदत कक्षाला फोन केला. यावेळी त्यांच्या अकाऊंटमधून तब्बल साडे चार लाख रुपये डेबिट झाल्याचं दिसलं. त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. व्यावसायिकाचं व्हॉट्सअॅप हॅक करण्यात आल्याचं समोर आलंय. आतापर्यंत लिंक पाठवून बँक खातं रिकामं केलं जात होतं. आता मात्र गुन्हेगारांनी पाठवलेल्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा व्हॉट्सअॅप तर कधी कधी मोबाइल हॅक केला जातो. 

Advertisement

कुठे कराल तक्रार?

तुमच्यासोबत असं काही घडल्यास राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. चक्षू पोर्टलचा वापर करून तुम्ही नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करू शकता.