Hindu Saints' Conference in Malegaon : मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगावात होणाऱ्या विराट हिंदू संत संमेलनाला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. मालेगावात प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत 30 मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संत संमेलनाची घोषणा करण्यात आली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचार करता उच्च न्यायालयाने काही अटींवर संमेलनास परवानगी दिली आहे. साध्वी प्रज्ञा यांना 'हिंदूवीर' पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. प्रक्षोभक भाषण केले जाणार नाही. तसेच 5 वाजेच्या आत कार्यक्रम संपवण्याची हमी आयोजकांनी पोलिसांना लेखी स्वरूपात द्यावेत असं निर्देश आहेत.
नक्की वाचा - Gudi Padwa 2025: गुढीपाडवा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि सणाचे महत्त्व
न्यायालयाने यासंदर्भातील निर्देश दिले आहे. गुढी पाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना हिंदू वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती, परंतु आयोजकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही सशर्त मंजुरी मिळाली असून आयोजकांनी आता कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू केली आहे.