
बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्यानं आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं उघड होत आहेत. काही दिवसांपूर्वा आग्रामधील एका इंजिनिअरनं याच कारणांमुळे आत्महत्या केली होती. आता मुंबईतल्या 41 वर्षांच्या तरुणानं या कारणामुळे एका हॉटेलच्या खोलीत जीव दिला आहे. निशांत त्रिपाठी असं या तरुणाचं नाव आहे. त्यानं मुंबईतल्या सहारा हॉटेलमध्ये मागील शुक्रवारी आत्महत्या केली. निशांतनं कंपनीच्या वेबसाईटवर सुसाईड नोट अपलोड केली आहे. त्यामध्ये त्यानं पत्नी आणि तिच्या मावशीवर ठपका ठेवला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार निशांतनं तीन दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये चेक इन केले होते. त्यानं रुमच्या दरवाज्यावर कुणीही व्यत्यय आणू नये यासाठी 'Do Not Distrub' हा बोर्ड लावला होता. त्यानंतर त्यानं गळफास घेऊन जीव दिला. बऱ्याच काळापासून रुममधून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर हॉटेलच्या स्टाफनं मास्टक की च्या मदतीनं रुममध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना निशांत मृतावस्थेत आढळला.
या प्रकरणात निशांतची पत्नी अपूर्वा पारिख आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा यांच्यावर आत्महत्येता प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांतच्या आई निलम चतुर्वेदी यांनी केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आलीय. पण, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
( नक्की वाचा : Santosh Deshmukh काय होते संतोष देशमुखांचे शेवटचे शब्द? मुलगी वैभवीनं रडत-रडत सांगितलं, Exclusive Video )
शेवटच्या पत्रात काय?
निशांतनं त्याची पत्नी अपूर्वासाठी मृत्यूपूर्वी पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यानं लिहिलं की, 'हाय बेव, तू हे वाचशील तोपर्यंत मी निघून गेलो असेल. जे काही झालं त्याबद्दल मी तुझा शेवटच्या क्षणापर्यंत द्वेष करु शकलो असतो. पण, मी या क्षमी प्रेमाची निवड केली आहे.
मी तुझ्यावर तेव्हाही प्रेम करत होतो. मी तुझ्यावर आजही प्रेम करतो. मी वचन दिलंय त्याप्रमाणे हे प्रेम कधीही कमी होणार नाही. मी किती संघर्ष केलाय हे माझ्या आईला माहिती आहे. तू आणि प्रार्थना मावशीच माझ्या मृत्यूचं कारण आहेत. त्यामुळे मी तुझ्याकडे भीक मागतो, माझ्या आईकडं जाऊ नकोस. ती कोसळली असेल. तिला एकटीनं शोक व्यक्त करु दे.'
निशांतनं हे पत्र कंपनीच्या वेबसाईटवर सुरक्षित पासवर्डसह अपलोड केलं होतं. त्यामध्ये त्यानं पत्नी आणि तिच्या मावशीला आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे.
निशांतच्या आईनं मुलाच्या मृत्यूनंतर फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी आज मला एका जिवंत प्रेतासारखे वाटत आहे, अशी भावना व्यक्त केली आहे. मी माझं संपूर्ण आयुष्य महिलांचे हक्क आणि लैंगिक समानतेसाठी समर्पित केले होते.
आज माझे आयुष्य संपले. माझा मुलगा निशांत मला सोडून गेला. मी आता एका जिवंत प्रेतासारखी बनली आहे. त्यानं माझे अंत्यसंस्कार करायला हवेत. पण, आज 2 मार्च रोजी माझ्या मुलावर "ECO-MOKSHA" मुंबई येथे अंत्यसंस्कार केले आहेत.
माझी मुलगी प्राचीनं तिच्या मोठ्या भावावर अंत्यसंस्कार केले. मला आई माझ्या मुलीला हा शोक पचण्यासाठी बळ द्या, असं भावनिक आवाहन चतुर्वेदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केलं आहे.
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world