Trending News: एका व्यक्तीच्या आयुष्यातील धक्कादायक टोकाचे पाऊल सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे. चार मुलांचा बाप असलेल्या एका व्यक्तीने स्वतःचा जीव संपवण्यापूर्वी जे काही केले, ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. या व्यक्तीने केवळ आत्महत्या केली नाही, तर गळफास घेण्यापासून ते मृत्यू होईपर्यंतचा सर्व थरार आपल्याच मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामागचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकलेला बाप
या टोकाच्या निर्णयामागे एका तरुणीसोबत असलेले प्रेमसंबंध कारणीभूत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. संबंधित व्यक्तीचे एका तरुणीसोबत अफेअर होते, परंतु याच नात्याचा फायदा घेत ती तरुणी त्याला ब्लॅकमेल करत होती.
ती तरुणी त्याच्याकडे वारंवार मोठ्या रक्कमेची मागणी करत होती. या पैशांच्या मागणीला आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर त्या व्यक्तीने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
( नक्की वाचा : Shocking News : आधी दगड आणि विटांनी ठेचले, मग मृतदेह कुत्र्यांच्या हवाली केला, मित्रानंच केली मित्राची हत्या ! )
कोटा शहरात घडली धक्कादायक घटना
हे संपूर्ण प्रकरण राजस्थानमधील कोटा येथे घडले आहे. गुमानपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भोई मोहल्ल्यात ही घटना उघडकीस आली. या मृत व्यक्तीची ओळख झालावाड येथील रहिवासी बिरदीचंद म्हणून झाली आहे.
बिरदीचंद हा 40 वर्षांचा होता आणि त्याला 4 मुले आहेत. तो सध्या कोटा येथे वास्तव्यास होता. त्याने 2 दिवसांपूर्वी आपल्या घरात टोकाचे पाऊल उचलले, मात्र त्याचा व्हिडिओ आता समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मोबाईलमधील रेकॉर्डिंग ठरले पुरावा
बिरदीचंदने आत्महत्या करण्यापूर्वी आपला मोबाईल समोरच्या बाजूला नीट सेट केला होता. त्याने रेकॉर्डिंग बटण ऑन केले आणि त्यानंतर तो बाथरूमच्या अँगलला लटकला. गळफास घेतल्यापासून जीव जाईपर्यंतची सर्व दृश्ये त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली आहेत.
( नक्की वाचा : Trending News: तुमच्या घरचे नोकर खरंच विश्वासू आहेत का? 'या' घरात 5 वर्ष सुरु होता भयंकर खेळ, वाचून येईल काटा! )
त्याच्या पत्नीने आता पोलिसात तक्रार दिली असून त्या तरुणीवर ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांना पैशांसाठी इतके मानसिक त्रास दिले गेले की त्यांना दुसरा कोणताही मार्ग सुचला नाही, असे पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेची माहिती मिळताच गुमानपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी मृताचा मोबाईल जप्त केला असून त्यातील कॉल डिटेल्स आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची तपासणी सुरू केली आहे. ज्या तरुणीवर आरोप झाले आहेत, तिचीही चौकशी केली जाणार आहे. एका मोठ्या कुटुंबाचा आधार असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे जीव दिल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world