Fraud News: अंधश्रद्धा अन् जादूटोण्याचा फास... आईच्या उपचाराचे आमिष दाखवत तरुणाला 3 कोटींचा गंडा

Mumbai Fraud News: २२ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, ही फसवणूक २०१९ ते फेब्रुवारी २०२५ या सहा वर्षांच्या काळात करण्यात आली. आरोपींनी “आईच्या आजारपणावर इलाज करू” असे आमिष दाखवून मोठी रक्कम उकळली.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार नेरुळमध्ये उघडकीस आला आहे. तब्बल ₹३ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नेरुळ पोलिसांकडे दाखल झाली आहे. २२ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, ही फसवणूक २०१९ ते फेब्रुवारी २०२५ या सहा वर्षांच्या काळात करण्यात आली. आरोपींनी “आईच्या आजारपणावर इलाज करू” असे आमिष दाखवून मोठी रक्कम उकळली.

दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुण घोडेकर याने त्यांच्यावर विश्वास ठेवून या काळात तब्बल ₹३.१० कोटी रुपये दिले. त्यापैकी केवळ ₹१९ लाख रुपये परत करण्यात आले, तर उर्वरित ₹२ कोटी ९१ लाख रुपये परत केले नाहीत. मुस्तफा शेख उर्फ कांबळे, आहत शेख, सफिना ननु शेख, ननु शेख, वसीम शेख आणि रफीक शेख. हे सर्व आरोपी पालघर जिल्ह्यातील सापफळे परिसरातील रहिवासी आहेत.

Shocking: 'भ्रष्टाचारातून पैसा, अय्याशीसाठी थायलंड'; Deputy Collector पतीची पत्नीकडूनच पोलखोल

पीडिताने वारंवार पैशांची मागणी केल्यावर आरोपींनी त्याला व कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. याशिवाय, जबरदस्तीने रिकाम्या स्टँप पेपरवर सही करून घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी कलम 406, 420, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींवर महाराष्ट्र मानव बलिदान व इतर अमानवी, घातक व अघोरी प्रथा आणि काळ्या जादूच्या निर्मूलन कायदा, २०१३ अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मोहिटे करत असून, प्रकरणाचे पर्यवेक्षण वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी (नेरुळ पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महिना भरापूर्वी सीबीडी बेलापूर येथेही याच धर्तीवरील एक प्रकार घडला होता. त्यात एका वकिलाला तब्बल ₹२० लाखांनी फसवले होते. त्या प्रकरणात पोलिसांनी केवळ २४ तासांत आरोपींना अटक करून कारवाई केली होती.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणांमुळे नवी मुंबईत चिंतेचे वातावरण पसरले आहे. गंभीर आजारपण किंवा संकटाच्या काळात अनेक कुटुंबे अंधश्रद्धा व खोट्या दाव्यांच्या आहारी जाऊन फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात सापडतात, यावरून पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. कोणीही संशयास्पद इलाज किंवा चमत्काराच्या नावाखाली पैसे मागत असल्यास तातडीने पोलिसांना कळवा. नागरिक थेट नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क साधू शकतात.”

( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवली हादरले: नमाजासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांसमोरच मारहाण; शिंदे गटाच्या सरपंचावर आरोप )

Topics mentioned in this article