डिजिटल अटकेची धमकी, Video Call वर कपडे काढायला लावले अन्... मुंबईतील तरुणीला लुटले

दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी 1.7 लाख रुपये लुटले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: डिजीटल अटकेची धमकी देऊन व्हिडिओ कॉल दरम्यान महिलेला कपडे उतरवण्यास भाग पाडत तब्बल 1. 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार राजधानी मुंबईमध्ये घडला आहे. दिल्ली पोलीस असल्याची बतावणी करत या महिलेला लुटण्यात आले असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकेचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. सायबर चोरट्यांनी मुंबईतील एका 26 वर्षीय महिलेला व्हिडिओ कॉल दरम्यान तिचे कपडे काढण्यास भाग पाडले. तसेच दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी 1.7 लाख रुपये लुटले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नक्की वाचा:  'गृहमंत्रीपद मिळणार नाही...', भाजपकडून एकनाथ शिंदेंना निरोप? 'या' 3 खात्यांमुळे तिढा सुटेना

हे प्रकरण बोरिवली पूर्वमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. 19 नोव्हेंबर रोजी पीडित महिलेशी सायबर चोरट्यांनी संपर्क साधला आणि एका व्यवसायाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिचा सहभाग असल्याचा आरोप केला. फार्मा कंपनी असल्याचा दावा करत या चोरट्यांनी महिलेला व्हिडिओ कॉल दरम्यान चौकशीसाठी हॉटेलची खोली बुक करण्यासही भाग पाडले.

धक्कादायक म्हणजे या चोरट्यांनी महिलेला शारीरिक पडताळणीसाठी तिचे सर्व कपडे उतरवण्यासही भाग पडले. तसेच तिच्याकडून  1,78,000 रुपये बँक खात्याच्या पडताळणीसाठी पाठवण्यास सांगितले. तपासात सहकार्य करा अन्यथा अटक करु अशी धमकीही देण्यात आली. या प्रकारने घाबरुन गेलेली महिला त्यांच्या फसवणुकीला बळी पडली.

Advertisement

दरम्यान, जेव्हा महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा तिने 28 नोव्हेंबर रोजी एफआयआर दाखल केला आणि मुंबई पोलिसांनी भारतीय न्यायिक संहिता (BNS) आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली खंडणी आणि छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

महत्वाची बातमी: एकदाचं ठरलं! 5 तारखेला 5 वाजता आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी