जाहिरात

एकदाचं ठरलं! 5 तारखेला 5 वाजता आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी

महायुतीचा शपथविधी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.

एकदाचं ठरलं! 5 तारखेला 5 वाजता आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी
मुंबई:

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा झाली. तरी नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी मुहूर्त सापडत नव्हता. अखेर महायुतीचा शपथविधी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. आझाद मैदानात हा शपथविधी होणार असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहाणार आहेत.याबाबतची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत सांगितलं आहे. या शपथविधीला भाजप शासीत राज्यातले मुख्यमंत्री ही उपस्थित राहाणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालं. त्यानंतर आठवडा झाला तरी नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा पत्ता नव्हता. आता शपथविधी कधी आणि कुठे होणार आहे हे स्पष्ट झालं आहे. 5 डिसेंबरला  संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानात हा शपथविधी होईल. शपथविधी ठरला असला तरी मुख्यमंत्री कोण हे अजूनही गुलदस्त्यात आहे. शपथविधीबाबतचा सस्पेन्स संपला असला तरी मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. 

ट्रेंडिंग बातमी - EVM मध्ये 15% मतं सेट केली गेली? शरद पवारांनी दिलं भन्नाट उत्तर

देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्री असतील असं बोललं जात आहे. त्यांच्या नावाची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. तर सरकारमध्य दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यातले अजित पवारांचे नाव निश्चित आहे. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार हे अजूनही निश्चित नाही. शिवाय कोणाला कोणते खाते मिळणार हे ही निश्चित नाही. त्यात एकनाथ शिंदे हे गृहमंत्रालयासाठी आग्रही आहेत. त्यामुळे भाजप हे खातं शिंदेंना सोडणार का? याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांना अर्थ खाते मिळण्याची दाट शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदेंच्या गावातल्या गावकऱ्यांना काय वाटतं?

नव्या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात किती मंत्री शपथ घेणार हे अजून स्पष्ट नाही. मात्र प्रत्येक दहा मंत्री शपथ घेतील असं बोललं जात आहे.  आठ ते दहा मंत्रीपदं अजित पवारांच्या वाट्याला तर शिंदेंच्या वाट्याला बारा मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे. शिंदे आणि अजित पवारांकडून अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यात किती जाणांचा संधी मिळते हे पहावं लागणार आहे. भाजपमध्येही काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.