Mumbai News : CSMT ते खोपोली लोकलमध्ये घडला रक्तपात; वांगणी स्टेशन पार करताच सतीशसोबत भयंकर घडलं!

मुंबईची लाइफ लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो

Mumbai News : मुंबईची लाइफ लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लोकल ट्रेनमध्ये सीटवरुन एका तरुणाला काही लोकांनी चाकू खुपसून जखमी केलं. या प्रकरणात जीआरपीने तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मारहाणीची ही घटना गुरुवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये घडली. 


काय आहे संपूर्ण प्रकरण? 

धावत्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये सीटवरुन काही जणांमध्ये वाद झाला होता. एका तरुणाला काही जणांनी मिळून मारहाण केली. यानंतर आरोपींनी चाकू खुपसून त्याला जखमी केलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लोकल ट्रेनने वांगली रेल्वे स्टेशन पार केलं होतं. तेव्हा त्या तरुणाचे काही अन्य तरुणांसोबत लगेच कंपार्टमेंटमध्ये सीटवरुन वाद झाला. हा वाद मारहाणीत बदलला. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai News : सेजल पवारला दणका, 5 सदस्यीय समितीची स्थापना; KEM रुग्णालयाकडून कडक कारवाईचे आदेश


मुंबईतील मशिद बंदरमध्ये राहणारा तरुण...

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी तरुणाच्या पोटात चाकू खुपसला होता. त्यात पीडित तरुण गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित तरुणाचं नाव सतीश पाठक (२६) आहे. तो मशिद बंदर येथील राहणारा आहे. घटनेनंतर कर्जत जीआरपीने प्रकरणाचा तपास सुरू केला. अनेक तासांनंतर जीआरपीने दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींचं नाव इमरान इदरीस अन्सारी (१८) आणि करण कन्हैयालाल अग्रवाल (२२) आहे. तिसरा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. 

Topics mentioned in this article