Mumbai News : इंदूरनंतर मुंबईतील 9 किन्नरांचा आत्महत्येचा प्रयत्न, टोकाचं पाऊल का उचलत आहेत?

मुंबईत 9 किन्नरांनी विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
किन्‍नरों ने पिया जहर
मुंबई:

मुंबईत 9 किन्नरांनी विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे सर्व आपले अध्यात्मिक नेता सलमा खान आणि किन्नर माँ संस्थानाविरोधात केलेल्या अपमानास्पद टिप्पणीमुळे दु:खी झाल्या होत्या. यापूर्वी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 24 किन्नरांची एकत्रितपणे विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुदैवाने दोन्ही प्रकरणात कोणतीही कोणीही जीव गमावला नाही. 

आपल्या गुरुबाबत आपत्तीजनक टिप्पणीमुळे दु:खी झालेल्या मुंबईतील नऊ किन्नरांनी धक्कादायक पाऊस उचललं. साधारण ९ किन्नरांनी फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सर्वजण सुरक्षित आहेत आणि उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. 

नक्की वाचा - Chandrapur News : नातवाला संकटात पाहून आजोबांनी मारली उडी, ऐन दिवाळीत चंद्रपुरातील मन हेलावणारी घटना

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किन्नरांपैकी एकाने दावा केला आहे क, काहींनी त्यांची अध्यात्मिक नेता सलमा खान आणि किन्नर माँ संस्थेविरोधात केलेल्या अपमानास्पद टिप्पणीमुळे त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचललं. येथील अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, ही घटना विक्रोळीच्या अमृत नगर सर्कल येथील संस्थेच्या कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर घडली. 

Advertisement
Topics mentioned in this article