Who Is Gangster DK Rao : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी अंडरवर्ल्डवर मोठी कारवाई करत छोटा राजन गँगचा कुख्यात गँगस्टर डीके रावला अटक केली. त्याच्यासोबतच दोन अन्य आरोपी अनिल सिंह आणि मिमित भूटालाही बेड्या ठोकल्या आहेत.जबरदस्ती खंडणी वसुली आणि धमकी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण मुंबईच्या बिल्डर सर्कलशी जोडलेलं असून यामध्ये 1.25 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटलंय की, शुक्रवारच्या सायंकाळी गँगस्टर डीके राव त्याच्या दोन साथीदारांसह दक्षिण मुंबईच्या सत्र न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पोहोचला होता.तेव्हा पोलिसांच्या एका टीमने त्याला न्यायालय परिसरातच पकडलं. तसच त्याच्यासोबत असलेल्या दोन्ही साथीदारांनाही घटनास्थळी अटक केली. एका बिल्डरने तक्रारदाराकडून 1.25 कोटी रुपये घेतले होते. पण त्याने ही रक्कम परत केली नाही.
त्यानंतर तक्रारदाराने त्याचे पैसे मागण्यास सुरुवात केली. तेव्हा डीके राव आणि त्याच्या गँगने त्याला धमकावण्यास सुरुवात केली. त्याच्या साथीदारांनी तक्रारदाराला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली.त्यानंतर तक्रारदार पोलिसांकडे गेला आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.याप्रकरणी आयपीसीच्या कलम 308(4),61(2) आणि 3(5)च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली.
नक्की वाचा >> भारतात कसं होतं Adult Movies चं शूटिंग? पडद्यामागे काय काय घडतं? या अभिनेत्यानं केली पोलखोल, "रुम देतात आणि.."
डीके राव छोटा राजनचा राईट हँड होता, पण..
यावर्षी जानेवारी महिन्यातही डीके रावला अन्य साथीदारांसोबत अटक केली होती. एका हॉटेल मालकाकडे त्यांनी 2.5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा आरोप आहे. डीके राव एकेकाळी छोटा राजन सर्वात विश्वासू साथीदार म्हणून ओळखलं जायचं.90 च्या दशकात डीके राव छोटा राजनचा राईट हँड मानला जायचा. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हेही दाखल असल्याची माहिती आहे. वर्ष 2002 मध्ये जेव्हा छोटा राजन आणि त्याचा साथीदार ओपी सिंह यांच्यात मतभेद झाले,तेव्हाही डीकेचं नाव चर्चेत होतं.
नक्की वाचा >> फक्त 5 कोटींचा बजेट! पण कमाई 120 कोटींची..2025 चा 'हा' ब्लॉकबस्टर सिनेमा वीकेंडला पाहायला अजिबात विसरू नका
ओपी सिंह नाशिक जेलमध्ये होता. त्याच्या विरोधात कट रचल्याचा आरोप छोटा राजनवर होता. डीके राव आणि त्यांचे काही साथीदार स्वत:ला दुसऱ्या जेलमध्ये ट्रान्सफर करून ओपी सिंहच्या हत्येत सामील झाले. आणखी एका प्रकरणात डीके राव पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता.त्यावेळी त्याचे चार साथीदार मारले गेले होते. पण डी के राव कसाबसा वाचला होता. तो दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातील गँगवार दरम्यानही जीवंत वाचला.