जाहिरात

Mumbai News: मुंबई पोलिसांचं दिवाळी स्पेशल रिटर्न गिफ्ट! 113 जणांचा आनंद गगनात मावेना, नेमकं काय घडलं?

विशेष म्हणजे, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या वतीने दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मागील दोन वर्षांपासून हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मालकांना परत देण्यात आले.

Mumbai News: मुंबई पोलिसांचं दिवाळी स्पेशल रिटर्न गिफ्ट! 113 जणांचा आनंद गगनात मावेना, नेमकं काय घडलं?

 मुंबई: दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत चोरी झालेले तसेच हरवलेले मोबाईल फोन शोधण्याच्या मोहिमेत उल्लेखनीय यश मिळाले आहे. CEIR पोर्टलवर नोंद झालेल्या मोबाईल फोनपैकी एकूण 113 विविध कंपन्यांचे मोबाईल फोन शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पी एस कांबळे यांनी कौशल्यपूर्ण तपासाद्वारे शोधून काढले आहेत.

ही कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ श्री. महेंद्र पंडित साहेब तसेच शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विलास दातीर यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विविध इसमांकडून हस्तगत करण्यात आलेल्या या मोबाईल फोनची एकूण किंमत अंदाजे ₹20,50,000/- ( वीस लाख 50 हजार) इतकी आहे. विशेष म्हणजे, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या वतीने दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मागील दोन वर्षांपासून हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मालकांना परत देण्यात आले.

Ambernath News : सरकारी रुग्णवाहिका उपमुख्यमंत्र्यांच्या सेवेत; महिला रुग्णाच्या मृत्यूने कुटुंबाचा आक्रोश

आपला मोबाईल हरवलेला परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची लहर उमटली. अनेकांनी कष्टाने, हप्त्यांवर किंवा लोनवर मोबाईल घेतलेले असल्याने त्यांचे पुन्हा मिळणे ही खरी दिवाळी ठरली.

ही संपूर्ण मोहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास दातीर , पोलीस उपनिरीक्षक रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून, पोलीस अंमलदार पी एस कांबळे, महिला अंमलदार गुट्टाळ यांनी दाखवलेली तत्परता, तांत्रिक कौशल्य आणि नागरिकाभिमुख वृत्ती ही प्रशंसनीय ठरली आहे.

नक्की वाचा - Pune News: 20 मजूरांसह 12 लहान मुलांना ठेवलं नजर कैदेत, वीट भट्टी मालकाचं हे अघोरी कृत्य का केलं?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com