मनोज सातवी, विरार: विरारसह संपूर्ण राज्यात आणि देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या "सुटकेस मर्डर केस" अर्थात कविता बडाला हत्या प्रकरणी आज वसई न्यायालयात आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. मे २०१६ मध्ये कविता बडाला या 27 वर्षीय विवाहितेची आर्थिक वादातून अपहरण करून हत्या आणि हत्येनंतर मृतदेह बॅगमध्ये भरून डहाणूतालुक्यात ती बॅग जाळून टाकली होती. तसेच कविताची हत्या केल्यानंतरही तिच्या वडिलांकडून तीस लाख रुपये आणि तीन किलो सोन्याची खंडणी मागितली होती. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तीन पुरुष आणि एका महिला आरोपी विरोधात वसई न्यायालयात दोषारोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे वसई न्यायालयात या चारही आरोपींना कोणती शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे हे भयंकर हत्याकांड?
विरार मध्ये राहणारी कविता अशोक बडाळा (वय 27 ) ही रत्नम इन्फोटेक कंपनीत चैन मार्केटिंग काम करत होती. तिच्याच सोबत आरोपी मोहीत कुमार, हा देखील काम करत होता. दिनांक 15 मे 2016 या दिवशी आरोपी रामअवतार शर्मा आणि शिवा रामकुमार शर्मा सदर कंपनीत मेंबर होणार होते, म्हणून कविताने सकाळी 9.15 वाजताच आपले घर सोडून ती विरार पश्चिमेला ग्लोबल सिटी परिसरातील आरोपी मोहीत कुमार याच्या घरी गेली होती. मात्र कविता ही संध्याकाळपर्यंत घरी पोहोचलीच नाही.
तसेच तिचा फोनही बंद येत असल्याने दिनांक 16/5/2016 रोजी कविताची बहीण शितल कोठारी हिने अर्नाळा पोलीस ठाण्यात बहीण कविताची हरवल्याबाबत तक्रार दाखल केली आणि याबाबतची माहिती तिने वडील किशनलाल कोठारी यांना दिली. त्याच दिवशी सांयकाळी 6 वाजता शितल हिला अंधेरी रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर यांनी फोन करून कविताची लॅपटॉप आणि इतर साहित्य असलेली बॅग अंधेरी स्थानकात सापडल्याचे सांगितले होते.
नक्की वाचा - OYO Hotel Booking : OYO मध्ये अविवाहित जोडप्याला NO Entry; Check-in पॉलिसीमध्ये मोठे बदल
आरोपी मोहितकुमार भगत याचेकडुन रत्नम इन्फोटेक कंपनीच्या आर्थिक व्यवहाराचे घेतलेले पैसे मयत कविता बडला हिने परत न केल्याच्या कारणावरून आणि वादातुन मुख्य आरोपीत मोहितकुमार भगत यांनी कविताचा गळा दाबुन खून केला. त्यावेळी आरोपी रामअवतार शर्मा, शिवा शर्मा यांनी तिचे पाय पकडले तर आरोपी युनिता शरवनन हीने गुन्हा करण्यास सहकार्य करून कविता बडाला हिला जिवे ठार मारले. त्यानंतर शिव शर्मा याने कविताचा लॅपटॉप असलेली बॅग अंधेरी रेल्वे स्थानकात सोडुन दिली.
तसेच इतर आरोपींनी भाडयाने ईझी कॅब आणुन गाडीच्या डिकीत तिचे प्रेत असलेली बॅग भरून प्रथमत: गाडी दहसीर येथे घेवून जावुन तेथे शिवा शर्मा ला सोबत घेवून पुढे मुंबई अहमदाबाद मार्गाने गाडी बोईसर येथे घेवून जावुन तेथुन पुढे वाणगाव मार्गे चारोटी येथे नेली. त्यांनतर पुन्हा मुंबई अहमदाबाद मार्गाने गाडी वापी येथे नेली होती. पुन्हा रात्रौ 9 वाजताचे सुमारास पुन्हा चारोटी मार्गे साखरे येथे जावुन मयत कविता बडाला हिचे प्रेत असलेली बॅग साखरे गावचे हददीतील घाटात फेकुन देवून पुन्हा दिनांक16. 5. 2016 रोजी सायंकाळी मोटार सायकलने प्रेत असलेली बॅग पेट्रोल ओतून बॅग जाळुन टाकली.
त्यानंतर दिनांक 17. 5 2016 रोजी पहाटे कविताचे वडील किशनलाल सुंदरलाल कोठारी यांच्या फोनवर मुलगी कविताच्या मोबाईल नंबरवरुन फोन आला आरोपीने “तु कविता का बाप बोल रहा है ना, तुम्हारी लडकी सही सलामत है लेकीन होशियारी मत करना, मुझे तीस लाख रुपये और तीन किलो सोना चाहिए मै वापिस सुबह १०:३० बजे फोन करूंगा और जगह बताऊँगा, असे म्हणत खंडणी मागितली.
त्यानंतर पुन्हा दुपारी12.55 वाजता आरोपीने पुन्हा फोन करून “तु तीन किलो सोना और तिस लाख रुपये लेकर विरार से सुरत साईट निकल, अकेला आना, और गाडी लेके आना, और गाडी का नंबर मेरे को, एसएमएस कर, देड घंटे में तु पहुँचना चाहीऐ, नही तो तेरे लडकी का लाश मिलेगा" अशी धमकी दिली होती. त्यानंतर अर्नाळा पोलीस ठाण्यात दिनांक दि. १७/०५/२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कविताच्या हत्येनंतर खंडणीची मागणी आणि पोलिसांचा यशस्वी तपास आरोपींनी आपसात कट रचून कविता सोबत झालेल्या आर्थिक वादातुन तिचा गळा दाबून 15 मे 2016 रोजी ठार मारले होते. तसेच तिचे प्रेत व पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने बॅगेत भरून वाणगाव येथे घेवून जावुन जाळुन पुरावा नष्ट केला. परंतू कविताची हत्या केल्यानंतर आरोपींनी कविताच्या सुटकेसाठी तब्बल तीस लाख रुपये आणि तीन किलो सोने अशी खंडणीची मागणी केली होती. म्हणुन आरोपीत यांनी भा.दं.वि.सं कलम 302, 364 A, 386, १120 B, 109 ,201, 234 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यावेळी अर्नाळा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी एपीआय संदीप शिवळे आणि पोलीस निरीक्षक खोले यांच्या पथकाने आरोपींना खंडणीचे रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले होते. या अत्यंत किचकट अशा हत्या प्रकरणात फिर्यादींची बाजू सरकारी वकील जयप्रकाश पाटील यांनी कोर्टासमोर अत्यंत प्रभावीपणे मांडली असून तब्बल ५३ साक्षीदारांची पडताळणी करून चारही आरोपींवरील आरोप सिद्ध झाले आहेत. उद्या आरोपी मोहितकुमार भगत, रामअवतार शर्मा, शिवा रामकुमार शर्मा आणि युनिता शरवनंद यांना वसई कोर्टाचे न्यायाधीश कोणती शिक्षा सुनावतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात; खंडणी प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागणार?