स्वानंद पाटील, बीड:
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे. या निर्घृण हत्येने संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी होत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सर्व आरोपींना मोक्का लावण्यात यावा ही मागणी जोर धरत आहे. अशातच आता या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर ्माहिती अशी की, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड सुदर्शन घुलेसह इतर आठ जणांवर खंडणी हाफ मर्डरसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. घुले विरोधात यापूर्वी अपहरण केल्याची नोंद आहे. यावरून हे सर्व गुन्हेगार सराईत असल्याचे दिसून येते. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते.त्यामुळे आता त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणावर किती गुन्हे?
सुदर्शन घुले - 19
वाल्मीक कराड - 15
कृष्णा आंधळे - 6
महेश केदार - 6
प्रतिक घुले - 5
जयराम चाटे - 3
विष्णू चाटे - 2
सुधीर सांगळे - 2
चौकशी दरम्यान कराड अस्वस्थ होत आहे, शनिवारी रात्री 11 वा. वाल्मीक कराडला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाठीत जास्त दुखत असल्याचे कराड यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सानप यांनी तपासणी करून गोळ्या औषध दिले.
दरम्यान, खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबत एसआयटीतील स्थानिक गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला. विरोधकांनी याविरोधात आक्षेप नोंदवला असून हे अधिकारी कसे निष्पक्ष चौकशी करणार? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळेच आता या वादग्रस्त अधिकाऱ्यांनाही हटवले जाण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - OYO Hotel Booking : OYO मध्ये अविवाहित जोडप्याला NO Entry; Check-in पॉलिसीमध्ये मोठे बदल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world