निनाद करमारकर, ठाणे: मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाने ओळखीतल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून उपसरपंचाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुरबाडच्या नारिवली गावचा माजी उपसरपंच दयानंद भोईर याने त्याच्याच परिसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीला अभ्यासाचं मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने बोलावून आधी तिचा विनयभंग केला आणि त्यानंतर तिला गावातल्या एका पडीक घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
नक्की वाचा: लागोपाठ 8 विजय, 9 व्या निवडणुकीत पराभव, थोरात भावूक झाले
या प्रकारानंतर पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने दयानंद भोईर याने आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती दिली. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात दयानंद भोईर याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
महत्वाची बातमी: भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का होणार? 5 महत्त्वाची कारणं
दरम्यान, याआधी जालन्यामध्येही अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली होती. जालन्याच्या भोकरदन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला शेतवस्तवरील घरात ठरून तिच्यावर लैंगिक अत्याचार केवयाची घटना घडली होती. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन भोकरदन पोलिसांनी मुलाच्या मित्रांच्या चौकशी नंतर शेतवस्तीवर जाऊन मुलीला आणि मुलाला ताब्यात घेतले.
या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंंतर भोकरदन पोलिसांनी मुलीचे अपहरण व मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत मुलाची रवानगी बालसुधार गृहात केली असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.