जाहिरात

भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं

Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचीच निवड का केली? याची 5 महत्त्वाची कारणं आहेत.

भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदासाठी भाजपामधील सर्वोत्तम पर्याय का आहे?
मुंबई:

Devendra Fadnavis : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ महायुतीनं दणदणीत बहुमत मिळवले. या निवडणुकीत सर्वाधिक 132 जागा मिळणाऱ्या भाजपाचा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बुधवारी (4 डिसेंबर) रोजी बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. भाजपाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी (5 डिसेंबर) होणार आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारतीय जनता पार्टीनं निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार तात्काळ जाहीर केला नाही. भाजपामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत निवडणूक निकालानंतर वेगवेगळी चर्चा सुरु होती. भाजपानं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रस्थापित नेत्यांना बाजूला करत नव्या चेहऱ्याची मुख्यमंत्रिपदी निवड करत सर्वांनाच धक्का दिला होता. महाराष्ट्रातही भाजपा हा प्रयोग करणार का? याबाबत तर्क-वितर्क मांडले जात होते. 

अनेक दावेदार असले तरी भाजपाकडून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच निवड का होणार? याची 5 महत्त्वाची कारणं आपण पाहूया

दणदणीत विजयाचे शिल्पकार

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाची जोरदार पिछेहाट झाली होती. देवेंद्र फडणवीसांनी या पराभवाची जबाबदारी स्विकारत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. भाजपा श्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा फेटाळला. त्यामुळे फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी कायम राहिले.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर बॅकफुटवर गेलेल्या भाजपानं विधानसभेत दणदणीत कमबॅक केलंय. महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर भाजपाला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. भाजपाच्या या अभूतपूर्व विजयात फडणवीसांचं मोठं योगदान आहे. जागावाटप, बंडखोरांची समजूत, निवडणूक प्रचार या प्रत्येक ठिकाणी फडणवीस आघाडीवर होते. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर हताश झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण करण्याचं आणि त्या जोरावर विधासभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयश्री खेचून आणण्याचं काम फडणवीस यांनी अवघ्या पाच महिन्यात केलंय.

( नक्की वाचा : ठाण्याचे महापौरपद ते मुख्यमंत्रिपद... एकनाथ शिंदेंच्या नाराजीची 19 वर्षांची परंपरा, वाचा सविस्तर )
 

प्रशासनावर पकड

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्यानंतर पहिल्यांदाच पाच वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा विक्रम फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होते. या कार्यकाळात फडणवीस यांचं प्रशासकीय कौशल्य सर्वांनीच पाहिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट आहे. शिवसेनेकडून या पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. या दोघांनाही प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. त्याचबरोबर आक्रमक नेते अशीही त्यांची ओळख आहे. हे दोन नेते उपमुख्यमंत्री होत असतील तर मुख्यमंत्रीही तितकाच तोलामोलाचा देण्यावर भाजपाचा भर असेल. त्यासाठी महाराष्ट्र भाजपाकडं देवेंद्र फडणवीस हा सर्वोत्तम पर्याय होता.

( नक्की वाचा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं )
 

महापालिका निवडणुकांचं आव्हान

विधानसभा निवडणुकीत भाजपानं मोठं यश मिळवलंय. आता त्यानंतरही आणखी एक मोठी परीक्षा पक्षाला राज्यात द्यायची आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. या निवडणुकांचा न्यायालयीन अडथळा दूर झाल्यानंतर त्या निवडणुका होतील.

मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख शहरातील महानगरपालिका तसंच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात होतील. या सर्व निवडणुकात स्थानिक समीकरणांवर भाजपाची कसोटी लागेल. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अस्तित्व टिकवण्यासाठी झुंजणारा विरोधी पक्ष तसंच नंबर 1 वर लक्ष असलेले सहकारी पक्ष या सर्वांना मागं ठेवण्याचं आव्हान भाजपासमोर आहे. हे आव्हान पेलण्यासाठी देवेंद्र फडणवीस हा भक्कम पर्याय भाजपाकडं आहे.

( नक्की वाचा : Maharashtra Election Result 2024 : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय? )
 

विकासाचं व्हिजन असलेला नेता

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सुत्रं हाती घेतल्यापासून पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. मुंबईतील मेट्रो मार्गाचा झालेला विस्तार, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, इस्टर्न फ्री वे यामुळे मुंबई तसंच राज्यातील नागरिकांचं आयुष्य गतीमान झालंय. राज्याचा विकासाचं व्हिजन असलेला नेता अशी फडणवीसांची प्रतिमा आहे. त्यांच्या या प्रतिमेचा विधानसभा निवडणुकीत भाजपाला फायदा झाला. विशेषत: शहरी भागात फडणवीसांची प्रतिमा यामुळे अधिक उजळली आहे.

महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीसाठी देशातील अव्वल राज्य आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जगभरातील गुंतवणुकदारांची मोठी पसंती महाराष्ट्राला असते. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे परिणाम शेअर मार्केटमध्येही जाणवतात. आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राला नंबर 1 ठेवण्यासाठी तसंच 'लाडकी बहीण' सारख्या कल्याणकारी योजनांमुळे राज्याची नाजूक आर्थिक घडी बिघडणार नाही ही काळजी नव्या मुख्यमंत्र्याला करावी लागेल. ही जबाबदारी पार पडण्यासाठी अनुभव आणि क्षमता या बाबतीत फडणवीस सरस आहेत.

संघाचा भक्कम पाठिंबा

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्य़ा विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान मोठं आहे. लोकसभा निवडणुकीत शांत असलेल्या संघ स्वयंसेवकांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये जागृतीचं मोठं काम केलं. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष सुरु झालं आहे. 2025 साली विजयादशमीच्या दिवशी संघाला 100 वर्ष पूर्ण होतील. या शताब्दी वर्षात संघ मुख्यालय असलेल्या नागपुरातील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असावे ही संघाची इच्छा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह वेगवेगळ्या साधू संतांचीही फडणवीस ही पहिली फडणवीसच होते.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com