
Waqf Bengal Violence : वक्फ सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत संमत झालं (Waqf Amendment Bill passed), राष्ट्रपतींनीही त्यावर संमतीची मोहोर उमटवली. हे सगळं घडल्यानंतर वक्फच्या मुद्दावरून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मोठा हिंसाचार (Murshidabad Violence) उसळला आहे. हे विधेयक मागे घ्यावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं, ज्याला हिंसक वळण लागले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झडप झाली. यावेळी दंगेखोरांनी पोलिसांच्या गाड्यांना लक्ष्य केले. दंगेखोरांनी पोलिसांच्या गाड्यांसह अनेक गाड्यांना आग लावली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
VIDEO | West Bengal: People hold protest against Waqf (Amendment) law in Jangipur, Murshidabad. Protest turned violent as they allegedly vandalised a police vehicle and set it on fire.
— Press Trust of India (@PTI_News) April 8, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz pic.twitter.com/GUu0RsrQQo
दंगेखोरांनी पोलिसांच्या गाड्यांना प्रामुख्याने लक्ष्य केले. पोलिसांच्या गाड्यांसह सर्वसामान्यांच्या गाड्यांची त्यांनी तोडफोड केली आणि तुफान दगडफेक केली. अल्पसंख्यांक समुदायाने एक मोर्चा काढला होता.
जंगीपूरहून उमरपूरच्या दिशेने हा मोर्चा निघाला असता पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांच्या गाड्यांचा कोळसा आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवून दिल्या. इतकेच नाही तर बनियापूर आणि उमरपूरमधील घरांमध्ये घुसून आंदोलकांनी तोडफोड केली.
नक्की वाचा : लोकसभेत राज ठाकरेंचा विषय, हिंदी भाषिक खासदार आक्रमक, वाद पेटणार?
दंगेखोरांचा जमाव इतका हिंसक झाला होता की पोलिसांनाही अर्धा तासासाठी माघार घेत त्या भागातून बाहेर पडावे लागले होते. यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी रवाना करण्यात आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world