जाहिरात

Nipah Virus Outbreak: निपाह व्हायरसकडे दुर्लक्ष का करू नये? जाणून घ्या 5 कारणं, ही लक्षणं आढळल्यास व्हा सावध

Nipah Virus Outbreak: निपाह व्हायरस अतिशय धोकादायक का मानला जातो, जाणून घ्या यामागील पाच मोठी कारणं....

Nipah Virus Outbreak: निपाह व्हायरसकडे दुर्लक्ष का करू नये? जाणून घ्या 5 कारणं, ही लक्षणं आढळल्यास व्हा सावध
"Nipah Virus Outbreak: निपाह व्हायरसचे रुग्ण आढळले, सतर्क राहा"
Canva

Nipah Virus Outbreak: निपाह व्हायरसबाबत जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा लोकांच्या मनात भीती निर्माण होते. या आजाराची प्रकरणं फार मोठ्या प्रमाणात आढळली नसली तरीही एखादा संसर्गग्रस्त रुग्ण आढळल्यास हेल्थ अलर्ट जारी केले जातात आणि सरकार तत्काळ अ‍ॅक्शन मोडमध्ये येते. निपाह व्हायरसबाबत इतकी भीती का आहे? असा प्रश्नही निर्माण होतो. कारण निपाह व्हायरस हा सामान्य व्हायरल आजारांप्रमाणे नाहीय, हा एक दुर्मीळ पण अतिशय घातक झुनोटिक व्हायरस आहे, जो प्राण्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरतो आणि अतिशय कमी वेळात जीवघेणे रुप घेऊ शकतो. सुरुवातीला याची लक्षणे सामान्य वाटतात, पण काही दिवसांतच हा व्हायरस मेंदूवर हल्ला करू शकतो. म्हणूनच आरोग्यतज्ज्ञ निपाह व्हायरसच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करत नाहीत. 

निपाह व्हायरस उद्रेकादरम्यान का सतर्क राहावे? जाणून घेऊया निपाह व्हायरसबाबतची 5 मोठी कारणं

1. निपाह व्हायरसचे मृत्यूदर  

निपाह व्हायरसमुळे होणाऱ्या आजारातील सर्वात भीतीदायक बाब म्हणजे यातील उच्च मृत्यूदर. अनेक प्रकरणांमध्ये मृत्यूदर 40 टक्के ते 75 टक्क्यांपर्यंत आढळून आलाय. म्हणजेच संसर्ग झालेल्या प्रत्येकी दोन ते तीन रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका असतो. मृत्यूदर जास्त असल्याने हा व्हायरस सामान्य फ्लू, डेंग्यू किंवा कोविड यासारख्या आजारांपेक्षा खूपच अधिक धोकादायक ठरतो.

2. निपाह व्हायरसची सुरुवातीची लक्षणे अगदी सामान्य असतात

निपाह व्हायरसचा दुसरा मोठा धोका म्हणजे या आजाराची सुरुवातीची लक्षणे अगदी सामान्य आजारांसारखी असतात. उदाहरणार्थ ताप येणे, डोकेदुखी, थकवा जाणवणे, स्नायूंमध्ये वेदना होणे इत्यादी. बहुतेक वेळा लोक याकडे सामान्य व्हायरल ताप किंवा फ्लू समजून दुर्लक्ष करतात. पण काहीच दिवसांत हा आजार एन्सेफलायटिस (मेंदूवरील सूज) मध्ये बदलू शकतो, जो प्राणघातक ठरू शकतो.

3. निपाह व्हायरस थेट मेंदूवर परिणाम करतो

निपाह व्हायरस केवळ फुफ्फुसांपुरता किंवा घशापुरता मर्यादित राहत नाही. तो मेंदूपर्यंत पोहोचून गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण करतो. यामुळे रुग्णाची गोंधळलेली अवस्था होऊ शकते, तसेच बेशुद्ध होणे, झटके येणे आणि अगदी कोमामध्ये जाण्याचीही शक्यता उद्भवू शकते. जेव्हा एखादा व्हायरस थेट मेंदूवर परिणाम करतो, तेव्हा त्यावर उपचार करणं अतिशय कठीण ठरते. त्यामुळेच डॉक्टर निपाह व्हायरसला सर्वात धोकादायक व्हायरसपैकी एक मानतात.

Latest and Breaking News on NDTV

4. निपाह व्हायरसवर ठोस उपचार किंवा लस उपलब्ध नाही

आजही निपाह व्हायरसवर कोणतीही ठराविक औषधे उपलब्ध नाहीत आणि कोणतीही अधिकृत मान्यता मिळालेली लस नाही. उपचार फक्त सपोर्टिव्ह केअरवर आधारित केला जातो, उदाहरणार्थ रुग्णाला ऑक्सिजन देणे, ICU मध्ये सतत निरीक्षण करणे, मेंदू आणि श्वसनाशी संबंधित गुंतागुंत नियंत्रित करणे इत्यादी.  

5. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व्हायरस पसरू शकतो का?

निपाह व्हायरस केवळ जनावरांकडून नाही तर संसर्गग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतरही पसरू शकतो. म्हणूनच रुग्णालयांमध्ये निपाह रुग्णांना वेगळे ठेवले जाते आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना PPE किट घालावे लागते. आजारावर वेळीच नियंत्रण न मिळाल्यास याचा मोठा उद्रेक होऊ शकतो.

Sleep Mistakes: डोक्याजवळ मोबाइल ठेवून झोपल्यास काय होतं? झोपताना 5 चुका करू नका, तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती

(नक्की वाचा: Sleep Mistakes: डोक्याजवळ मोबाइल ठेवून झोपल्यास काय होतं? झोपताना 5 चुका करू नका, तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती)

  • फळे खाणाऱ्या वटवाघळांद्वारे व्हायरस पसरतो. 
  • संसर्गग्रस्त फळे किंवा फळांचा रस
  • संसर्गग्रस्त प्राणी (उदा. डुकरे)
  • संसर्गग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यास आजाराची लागण होऊ शकते.

Health News: टॉयलेटमध्ये किती वेळ बसावे? जास्त वेळ बसल्यास शरीराचे काय नुकसान होऊ शकते?

(नक्की वाचा: Health News: टॉयलेटमध्ये किती वेळ बसावे? जास्त वेळ बसल्यास शरीराचे काय नुकसान होऊ शकते?)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com