Nagpur Crime : ना ड्रग अ‍ॅडिक्ट ना कुठलं व्यसन, तरीही उत्कर्षने आई-वडिलांची का मारलं? मानसोपचारतज्ज्ञांकडून धोक्याचा इशारा!

अत्यंत थंड डोक्याने जन्मदात्याना संपविणारा उत्कर्ष डाखोळे हा ड्रग अॅडिक्ट किंवा कुठलाही व्यसनी नाही हे स्पष्ट झाले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

नागपुरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका मुलाने आई वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपी मुलगा उत्कर्ष हा ड्रग अॅडिक्ट नसल्याचे नागपूर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. तरीही इतक्या शांतपणे तो आई-वडिलांची निर्घृण हत्या कसा करू शकतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे. घरात आई-वडिलांकडे मागण्यापूर्वीच त्याला हवं ते मिळत होतं. त्याला नकार पचवण्याची सवय नव्हती. त्यात एकूलता एक असल्यामुळे पालक त्याला हवं ते आणून देत होते. यातून त्याचा स्वभाव हेकट आणि एकल होत गेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरकरांना धक्का देणारे प्रकरण उघडकीस आले. 24 वर्षाच्या अपयशी अभियांत्रिकी विद्यार्थ्याने आई वडिलांची निर्घृण हत्या केल्याचे कबुल केले. इतक्या थंड डोक्याने जन्मदात्याना संपविणारा उत्कर्ष डाखोळे हा ड्रग अॅडिक्ट किंवा कुठलाही व्यसनी नाही हे स्पष्ट झाले आहे. सर्वसाधारणपणे अशा गुन्ह्यांमागे व्यसन कारणीभूत असल्याचं अधिकांश प्रकरणात पाहिलं जातं. मात्र येथे तर उत्कर्ष याला कसलच व्यसन नव्हतं. मग त्याने हा गुन्हा करण्याचे कारण काय?

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Share Market Fraud : शेअर मार्केटचं वेड, 4 कोटींचा नफा; सत्य समजताच उच्च न्यायालयाच्या वकिलांना बसला धक्का! 

उत्कर्षने चौकशीत सांगितलं की त्याच्या आई वडिलांनी त्याच्या सर्व इच्छा मागण्या नेहमी पूर्ण केल्या. पालक आपल्या पाल्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र लहानपणात त्यांच्यामध्ये हिंसक वर्तणूक दिसली तर त्याकडे लक्ष द्या. मुलांना नकार पचवायला, अपयश स्वीकारायला शिकविणे आवश्यक आहे. वारंवार अभियांत्रिकी परिक्षेत नापास होत असल्याने त्याला गावची शेती सांभाळण्याचा सल्ला देणे आई वडिलांना प्रचंड महाग पडले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ सुशील गावंडे यांनी देखील पोलिसांच्या भूमिकेचे समर्थन करत धोक्याचा इशारा देत आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Crime News: आईचा गळा आवळला, बापाला चाकूने मारलं, लेकानं असं का केलं? कारण ऐकून सर्वच हादरले

कित्येक पालकांचा आग्रह असतो, की आपल्याला लहानपणी ज्या वस्तू किंवा ज्या सोयी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना मिळायलाच पाहिजेत. कित्येक पालकांना अभिमान वाटतो, की आपल्या मुलांनी जे मागितलं ते आपण त्यांना तत्काळ देतो. मात्र मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, अशामुळे मुलांमध्ये नकार सहन न करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. सोबतीला त्यांची वर्तणूक हिंसक असली तर परिणाम भयानक घडू शकतात.

उत्कर्षने आई-वडिलांची का केली हत्या?
उत्कर्ष हा इंजिनिअरिंग करत होता. गेल्या सहा वर्षापासून तो शिकत होता. काही विषयात तो नापास झाला होता. त्यामुळे त्याचे आई वडीस त्याला इंजिनिअरिंग सोड आणि आयटीआय कर असं सांगत होते. शिवाय गावाला जावून शेती कर असा सल्लाही त्याला देत होते. गावाला जाण्यासाठी त्याची बॅगही भरली गेली होती. आई वडीलांचे सततचे टोमणे त्याला त्रासदायक वाटत होते. तर एक दिवस वडीलांनी त्याच्यावर हातही उचलला होता. हे त्याला अपमानजनक वाटत होते. त्याच बरोबर गावाला गेलो तर नागपूर सुटेल. मित्रमैत्रिणी सुटतील याची भिती त्याला होती. तसं होता कामा नये यासाठी त्याने आई वडीलांनाच संपवण्याचा निर्णय घेतला. आपल्या जबाबात त्यांने याची कबुली दिली. 


 

Topics mentioned in this article