Nagpur Crime: नागपूर शहरातील प्राइड हॉटेल समोर एका २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती, सोबतच त्याचा मित्र 34 वर्षीय गौरव कारडा हा गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता. या तरुणाची हत्या कोणी केली? याबाबत पोलीस तपास सुरु होता. या तपासातून आता धक्कादायक खुलासा झाला असून मैत्रिणीचा नंबर न दिल्याने त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मैत्रिणीचा नंबर न दिल्याने हत्या
नागपूर शहरातील प्राइड हॉटेल समोर 28 वर्षीय प्रणय नरेश नन्नावरे याचा मृतदेह आढळला होता. त्याचा मित्र 34 वर्षीय गौरव कारडा हा गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता. त्याच्यावर नागपूरच्या खामला चौकातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. आता या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून घटनेमागील नेमके कारण आता पोलिस तपासात समोर आले असून त्यामुळे पोलिस देखील थक्क झाले आहेत.
नागपूरच्या सोनेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रणय शेयर मार्केटचे काम करतो तर गौरव एका चार्टर्ड अकाऊंटेन्ट कडे कामाला आहे. प्रणय आणि गौरवने मुंबईवरून नादिया ऊर्फ अँरन नावाच्या तरुणीला नागपुरात पार्टी करण्यासाठी बोलवले होते. ते दोघ आपल्या चार मित्रांसमवेत तरुणीला घेऊन दाबो पब मध्ये गेले होते. गुरुवारी उशिरा रात्री त्यांची पार्टी रंगात आली असताना शेजाऱ्या टेबलवर बसलेल्या मेहुल याने त्यांच्या टेबलाजवळ येऊन त्या तरुणीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिचा मोबाईल नंबर मागितला.
नागपुर शहरात खळबळ...!
यावर गौरव आणि प्रणय या दोघांनी तीव्र आक्षेप घेतला आणि दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली. आरोपी सौम्य देशमुख, मेहुल आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी प्रणय आणि गौरव यांना पाहून घेण्याची धमकी दिली होती. पहाटे चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास प्रणय आणि गौरव पब बाहेर पडताच आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर लोखंडी सळई ने जीवघेणे प्रहार केले. यात प्रणव अत्यंत गंभीर रित्या जखमी झाला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.
गंभीर जखमी गौरव याला आय सी यू मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्यात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये 25 वर्षीय सौम्य देशमुख, 23 वर्षीय रोहित शेंबेकर, 26 वर्षीय मेहुल रहाटे, 24 वर्षीय राजू चावला, 27 वर्षीय रोहित यादव, 25 वर्षीय अनुज यादव आणि 27 वर्षीय तुषार नानकानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.