Nagpur Crime: इन्स्टाग्रामवर मैत्री, अल्पवयीन मुलीला फसवलं; बाळाला जन्म दिल्यावर... नागपुरातील धक्कदायक घटना

इंस्टाग्राम तसेच अन्य समाज माध्यमातून  चाललेल्या प्रकरणातून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur Crime: नागपूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पोलिसांनी 20 वर्षीय नराधमाला अटक केली आहे. या धक्कादायक घटनेने संतापाची लाट उसळली आहे. 

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी प्रज्वल खेडकर (वय 20 वर्ष) हा पाचपावली नागपूरचा रहिवासी असून बांधकाम साईटवर टाईल्स फिटिंगची कामे करतो. आरोपीने पीडित मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली आणि तीला लग्नाचे आमिष दाखवून तिला घरी आणले. त्याने मुलीचे आडनाव खेडकर असे आणि वय 20 वर्षे दाखवत तिचे आधार कार्डही बनवून घेतले होते. पीडिता अल्पवयीन असल्याने तिला या गंभीर परिणामांची कल्पना नव्हती.

ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून कुटुंब रडलं, तोच निघाला सैतान; HR मॅनेजरच्या हत्येचं धक्कादायक सत्य

मुलीने दिला बाळाला जन्म

पीडित मुलीची तब्येत बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिने एका बाळाला जन्म दिला. डॉक्टरांना तिच्या वयाची  शंका आली आणि त्यांनी तिला शाळा सोडल्याचा दाखला मागितला. त्यातून तिचे खरे वय 17 असल्याचे समोर आले. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर तपासाला वेग आला.

पोलिसांनी पीडितेच्या बयानावरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, इंस्टाग्राम तसेच अन्य समाज माध्यमातून  चाललेल्या प्रकरणातून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

( नक्की वाचा : Crime News : 100 तोळे सोने देऊनही सासरच्यांची भूक मिटेना; मुंबईच्या उच्चभ्रू कुटुंबातील छळाची धक्कादायक कहाणी )
 

Topics mentioned in this article