Nagpur Crime: भररस्त्यात गाडी थांबवून हल्ला, शिवसेनेच्या माजी उप जिल्हाप्रमुखाची निर्घृण हत्या, नागपुरात खळबळ

Nagpur Crime: सहा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, नागपूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हत्या, मारामारीच्या भयंकर घटना घडत आहेत. नागपूरमधून अशीच एक भयंकर घटना समोर आली असून माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. (19 एप्रिल) सायंकाळी 6 वाजता सहा तरुणांनी अंकुश कडू यांचा निर्घृणपणे खून केला. या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूरमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. कपिल नगर पोलिस ठाण्यांतर्गत म्हाडा कॉलनीजवळ अंकुश कडू यांच्यावर हल्ला करण्यात आला. सहा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले.

दरम्यान, जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कडू यांचे रिअल इस्टेट प्रॉपर्टी डिलिंग चे मोठे काम होते. या प्रॉपर्टी कामाच्या किंवा अन्य कुठल्या वादातून हत्या झाली असावी, असा पोलिसांना सध्या संशय आहे. घटनेनंतर पाच ते सहा आरोपी फरार झाले असून पोलिस पथक त्यांची ओळख पटविण्यात आणि ठाव ठिकाणा शोधण्यात व्यस्त आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात )

सांगलीच्या मिरजेमध्ये मजूराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला आहे.प्रकाश कांबळे ,वय 47 असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.रात्री शहरातल्या कोल्हापूर चा रेल्वे लाईन या ठिकाणी एका वडाच्या झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात सदर व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यानंतर एकच खळबळ उडाली,या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलीस उपाधीक्षक आणि महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Sanjay Raut .... उद्धव ठाकरेंसोबत कालच चर्चा झाली ! 'ठाकरे' युतीवर संजय राऊत यांचा मोठा खुलासा )