Nagpur Crime News : नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील एका भोंदूबाबाने काळी जादूच्या नावाखाली महिलेसोबत अश्लील कृत्य केलं. कुटुंबावरील संकट दूर करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने महिलेसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. या प्रकरणात भोंदूबाबावर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.
भोंदूबाबाचं घृणास्पद कृत्य
नागपूर नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवत महिलेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या एका भोंदूबाबावर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हबीबुल्ला मलिक उर्फ ‘मामा' असं या भोंदूबाबाचे नाव आहे. तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे. मात्र, मागील 20 वर्षांपासून तो नागपुरात स्थायिक आहे. या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नक्की वाचा - Video : 2 मिनिटभर बापाला थोबाडीत मारलं, आई शेजारी बसून मेंदी काढत राहिली; नागपूरमधील संतापजनक दृश्य
कुटुंबावरील संकट दूर करण्याच्या बहाण्याने त्याने महिलेची ओळख वाढवली आणि घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर "मी काळी जादू जाणतो" असे सांगत त्याने महिलेपुढे नग्न पूजा केली आणि त्याचा व्हिडिओ दाखवला. गेल्या अनेक दिवसांपासून तो महिलेसोबत अश्लील कृत्य करत होता, तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता. मात्र पीडित महिलेने धैर्य दाखवत पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवत भोंदूबाबाला अटक केली.
सदर भोंदूबाबा त्याच्या परिसरात ‘मामा' म्हणून ओळखला जातो. तो प्रामुख्याने कष्टकरी आणि गरीब लोकांना आपलं टार्गेट बनवत असे. साधारणपणे तो चहाच्या टपरीवरवर लोकांना हेरत होता. बऱ्याचदा चहाच्या टपरीवर थांबून लोक घरातील अडचणींवर बोलत असतात. येथे तो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत असे आणि "मी काळी जादू करतो" म्हणून आमिष दाखवित होता.