संजय तिवारी
दारू पिणाऱ्यांना जर दारू हवी असेल तर ते त्यासाठी काही करण्यास तयार असतात. अशाच एका तळीरामाने तर कमाल केली आहे. त्याच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरादर व्हायरल होत आहे. ही घटना नागपूरात घडली आहे. इथं एका तळीरामाने दारूसाठी चोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो चक्क पैसे घेण्याची जी छोटी जाळी असते त्यातून तो अलगद दारूच्या दुकानात घुसला. त्यानंतर त्याने दारूची चोरी केली. बरं तेवढ्यावर तो थांबला नाही. दारू तर मिळाली, पण गल्ल्यात पैसे असल्याचे ही त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने ते पैसेही चोरले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेख राजा शेख बाबा याला दारूची तलब आली. पण खिशात पैसे नव्हते. त्यामुळे त्याने चोरीचा निर्णय घेतला. तसा हा पठ्ठ्या अंगामासाने अगदी बारीक. या शरीरयष्टीचाच गैरफायदा त्याने घेतला. त्याने एक दारूचे दुकान निवडले. या दारूच्या दुकानात तो घुसला. आता दारू कशी चोरायची. कारण दारूचा सर्व स्टॉक जाळीच्या आत होता. त्यामुळे ज्या जाळीतून दारूच्या बाटल्या ग्राहकांना दिल्या जातात, तिथून आत घुसण्याचा निर्णय त्याने घेतला.
ट्रेंडिंग बातमी - Pune Bridge collapses: कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कसा कोसळला? कारण आलं समोर
इतक्या बारीक जागेतून तो बरोबर आत घुसला. त्यात त्याला कसलीही अडचण आली नाही. चोरी करताना त्याने तोंडावर मास्क लावला होता. आपल्याला विश्वास बसणार नाही. पण तो त्या छोट्याश्या जाळीतून आत घुसला. हे दारुचे दुकान नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशच्या हद्दीतील आहे. 6 जूनला मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकानाचे शेटर वाकुन ही चोरी केली. दारू बरोबरच त्याने गल्ल्यात असलेले 25 हजारांची रोख रक्कम ही घेतली. त्यानंतर जसा आला होता तसाच तो पसारही झाला. यापूर्वी त्या आरोपीने अमरावती येथेही वाहन चोरी केल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. नागपूर पोलिसांच्या क्राईम युनिट 4 पथकाने अटक केली आहे.