जाहिरात

Nagpur Fraud: 'खाणीत सोनं सापडलंय, पावती नाही..' पितळेचे दागिने देत 15 लाखांना लुटलं, पुण्यातील बंटी- बबलीचा प्रताप

Nagpur Fraud Case: ळख वाढवत त्यांनी अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी खाणीत सापडलेल्या सोन्याचे दागिने स्वस्तात देत असल्याचे  सांगितले.

Nagpur Fraud: 'खाणीत सोनं सापडलंय, पावती नाही..' पितळेचे दागिने देत 15 लाखांना लुटलं, पुण्यातील बंटी- बबलीचा प्रताप

प्रविण मुधोळकर, नागपूर: खाणीत सोने सापडले पण पावती नाही, म्हणून ते सराफाकडे विकता येत नाही, असे सांगत स्वस्तात दागिने देण्याचे आमिष दाखवून 15 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून विकलेले दागिने हे पितळेचे असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणी पलिसांनी आरोपी दांपत्याला अटक केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार  सरला अग्रवाल यांचे इतवारीत रजाई भंडार नावाचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानात एक दांपत्य आले. बेडशीट घेतली आणि नंतर ते परत करण्याच्या बहाण्याने पुन्हा आले. ओळख वाढवत त्यांनी अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी खाणीत सापडलेल्या सोन्याचे दागिने स्वस्तात देत असल्याचे  सांगितले.

हे सोने आम्हाला खाणीत सापडले त्यामुळे त्याची पावती नाही आणि ते सराफाकडेही विकता येणार नाही, असं या आरोपींनी सांगितले. विश्वास मिळवण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला चार मणी दिले. सराफाने ते सोन्याचे असल्याचे सांगितल्यावर अग्रवाल यांनी 15 लाखांत सौदा केला. मात्र, नंतर तपासणीत दिलेले दागिने पितळेचे असल्याचे स्पष्ट झाले.

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam Video: पहलगाम हल्ल्याचा सर्वात भयानक Video समोर, गोळ्या लागत होत्या, लोक कोसळत होते

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात अग्रवाल यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी  आरोपींना पुण्यातून अटक केली. याप्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: