जाहिरात

गुन्हेगारीचा भयंकर शेवट; 3 साथीदारांनीच केला घात; गळा चिरलेल्या अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह

नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक हत्येची घटना उघडकीस आली आहे.

गुन्हेगारीचा भयंकर शेवट; 3 साथीदारांनीच केला घात; गळा चिरलेल्या अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह

Nagpur News : नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक हत्येची घटना उघडकीस आली आहे. मालधक्का परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अब्दुल रहमान उर्फ अब्दुल रज्जाक असं मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. जुना वाद आणि पैशांच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे.

३ तरुणांनी गळा चिरून केली हत्या...
 

नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी मालधक्का परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. अब्दुल रहमान उर्फ अब्दुल रज्जाक (वय ३० वर्षे) असं मृत तरुणाचं नाव असून तो शांतीनगरमधील लाल नगर भागातील रहिवासी होता. पोलीस तपासानुसार, मृत अब्दुलची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री उशीरा झालेल्या वादानंतर कळमना परिसरातील तीन तरुणांनी त्याची गळा चिरून कथितपणे हत्या केली आणि ते घटनास्थळावरून फरार झाले.

नक्की वाचा - Nagpur: बलात्कार, ब्लॅकमेलिंग, काळ्या जादूनंतर बळजबरीने धर्मांतर; नागपुरात जवानाच्या पत्नीसोबत भयंकर प्रकार

बहिणीला आणि आईला शिवीगाळ केल्याचा राग...

घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. यानंतर गुन्हे शाखा युनिट-३ ने धडक कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल उईके, परमेश्वर उर्फ पप्पू संतोष पटेल आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पोलीस चौकशीनुसार, मृत आणि आरोपींमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता. मृत अब्दुलने एक दिवसापूर्वी परमेश्वर पटेलच्या घरात चाकूने हल्ला केला होता आणि त्याच्या बहिणीला तसेच आईला शिवीगाळ केली होती, असा आरोप आहे. याशिवाय, चोरीच्या एका प्रकरणात मिळालेल्या सुमारे ४ लाख रुपयांच्या वाटणीवरूनही दोन्ही गटामध्ये वाद सुरू होता. याच जुन्या वादातून रविवारी उशिरा रात्री दोन्ही पक्षांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, ज्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने अब्दुलचा गळा चिरून त्याची हत्या केली. सध्या तिन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस या हत्येमागील मुख्य कारण आणि घटनाक्रमाचा सखोल तपास करत आहेत.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com