जाहिरात

Nagpur News : पत्नीसोबत सतत वाद, पतीचा मानसिक तोल ढासळला; अशा ठिकाणी पोहोचला जिथून उतरणं झालं कठीण

Man Rescued from Apartment: या तरुणाचं नाव आकाश असून गेल्या काही महिन्यांपासून पत्नीसोबत वाद सुरू असल्याचं समजते.

Nagpur News : पत्नीसोबत सतत वाद, पतीचा मानसिक तोल ढासळला; अशा ठिकाणी पोहोचला जिथून उतरणं झालं कठीण

Nagpur News :10 मे रोजी, रविवारी रात्री नागपूरच्या रामदासपेठ परिसरातील एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील एका अरुंद खिडकीच्या सज्जावर एक तरुण दिसल्याने खळबळ उडाली होती. एका हाताने त्याने एक लहानशी वायर पकडलेली होती. या तरुणाची मानसिक स्थिती बिघडल्याचं दिसून येत आहे. हा तरुण आशिष अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर खिडकीच्या छज्ज्यावर बसून असलेला दिसत होता. पण ऐनवेळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पोहोचून मोठ्या प्रयत्नानंतर त्याची सुटका केली. 

तरुणासोबत नेमकं काय घडलं? 


या तरुणाचं नाव आकाश असून गेल्या काही महिन्यांपासून पत्नीसोबत वाद सुरू असल्याचं समजते. रविवारी आकाश दारूच्या नशेत पत्नीला भेटायला थेट सासरच्या घरी पोहोचला होता. यावेळी आकाशची त्याच्या सासरच्या मंडळींसोबत वाद झाला. त्यांच्यात धक्काबुक्की आणि हाणामारी झाली होती. तो तिथून निघून रामदासपेठ भागातील आशिष अपार्टमेंटमध्ये शिरला आणि इमारतीच्या गच्चीवर पोहोचला.

नक्की वाचा - Akola News : पहाटेच्या अंधारात बाईकस्वारांचं भयंकर कृत्य; रक्ताने माखलेलं गाठोडं पाहून पोलिसही हादरले

दारूच्या नशेत पाईपच्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, अचानक त्याचा तोल गेला आणि तो खिडकीच्या बाहेरील अरुंद सज्जावर अडकून पडला होता. नशेत असल्याने त्याला काहीच समजत नव्हतं. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याची सुटका करताच त्याने रडत रडत सर्वांचे आभार मानले.


पत्नीसोबत वाद, पतीचा मानसिक तोल ढासळला

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com