मनोज सातवी, मुंबई: पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षांच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भयंकर घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ताजी असतानाच आता नालासोपाऱ्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला असून नराधम बापानेच पोटच्या तीन लेकींवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 56 वर्षाच्या नराधम बापाने पोटच्या तीन लेकींवर आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन केला आहे. याप्रकरणी नराधम बापाविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल दाखल करुन त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्यात.
पिडीत मुली या सख्ख्या बहिणी असून त्या मूळच्या कोकणातील आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणारा नराधम बाप हा कुख्यात गुंड असून तो छोटा राजनचा शार्पशूटर असल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर खंडणी, गोळीबार, हत्येसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पाच मुली आहेत.
यापैकी तीन मुलींवर तो अनेक दिवसांपासून अत्याचार करत होता. धक्कादायक बाब म्हणजे बापाच्या अत्याचारातून गर्भवती झालेल्या एका मुलीचा पाच वेळा गर्भपातही करण्यात आला. सततच्या अत्याचारांना कंटाळून पीडित मुलींनी बापाविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, मुलींच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाच्या कोकणातून मुसक्या आवळण्यात आल्यात. बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणार्या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.
नक्की वाचा : CBSE दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार! कोणते मार्क्स धरणार ग्राह्य? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं
सरपंचाकडून मुलींवर अत्याचार...
दुसरीकडे, सरपंचाने आजीच्या मदतीने दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील विटावे गावात घडली आहे. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून सरपंच साईनाथ कोल्हे, संजय पवार व आजी संगीता आहीरे यांच्या विरोधात अनुसूचित जमाती प्रतिबंधक व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन अल्पवयीन मुलींना त्र्यंबकेश्वर, नाशिक व शिर्डी अहिल्यानगर व विटावे येथे शरीरसंबध केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.