Nanded News: नांदेड शहरात खळबळ! 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांची हत्या..पोलिसांचा मुख्य आरोपीवर गोळीबार अन्..

पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अंकुश गंधमवार याला ताब्यात घेत हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला.यादरम्यान खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या पायावर गोळी लागली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nanded Police Firing Case

योगेश लाठकर, प्रतिनिधी

Nanded Crime News : नांदेड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मागील तीन दिवसांत घडलेल्या 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांची हत्या झाली. याप्रकरणी बहुंताश आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी सोनू कल्याणकर नावाच्या व्यक्तीवर आरोपींनी प्राणघातक हल्ला करत त्याची हत्या केली.त्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपास करत 4 आरोपींना ताब्यात घेतलं. 

पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अंकुश गंधमवार याला ताब्यात घेत हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला.यादरम्यान खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या पायावर गोळी लागली. जखमीवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.गावगुंडमध्ये सातत्याने अशा घटना घडत असल्याने पोलिसांना आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आजच्या गोळीबारीच्या घटनेतून पोलिसांनी गुन्हेगारांना मोठा इशारा दिला आहे. गुन्हेगारी खपवून घेतली जाणारी नाही, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात कार खरेदी करताना सावध राहा, ग्राहकांची होतेय फसवणूक; पोलिसांनी चाकणमध्ये टोळीला पकडलं

या प्रकरणावर अशोक चव्हाण काय म्हणाले?

जिल्हा आणि राज्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचं काम पोलिसांचं आहे.आमचं पूर्ण सहकार्य राहील. कोणत्याही गुंडांना राजश्रय मिळणार नाही, हीच आमची भूमिका आहे. पोलिसांकडून कडक कारवाई करण्याची अपेक्षा आहे. पोलीस यावर कारवाई करेल, अशी माझी अपेक्षा आहे. निश्चितच गंभीर बाब आहे. पण चिंतेचं कारण नाही. ही गोष्ट आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीनं पावलं उचलावीत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर संतापजनक प्रकार, ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराट, VIDEO