Nashik News : नाशिक शहरातील काठे गल्ली भागातील वादग्रस्त धार्मिक स्थळावरील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण झालं आहे. त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून काठे गल्ली परिसरातील रस्ते अद्यापही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. या परिसरात दोन्ही गटांना येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आता या संपूर्ण अतिक्रमित जागेचा वाद येत्या 3 तारखेला निकाली निघणार आहे. तोपर्यंत वाद वाढू नये यासाठी पोलिसांवर मोठा जबाबदारी आहे. या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणात नाशिक मनपाकडून दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक स्थळाला धक्का न लावता आजूबाजूचे अतिक्रमण हटविण्यात आलं आहे.