Nashik News: घराबाहेर बोलावलं, भररस्त्यात निर्घृणपणे संपवलं; होळीच्या दिवशीच शहरात खळबळ

Nashik News: सुमित सोबत वैरागराचे जुने वाद असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना आढळून आले मात्र वादाचे नेमके कारण काय अद्याप स्पष्ट झाली  नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रांजल कुलकर्णी, नाशिक: मुंबई, पुण्यासह राज्यभरात आज होळी आणि धुलिवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात ठिकठिकाणी नागरिक धुलिवंदनाचा आनंद लुटत आहेत. एकीकडे राज्यभरात पवित्र सणाची धामधुम सुरु असतानाच नाशिकमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये होळीच्याच दिवशी एका तरुणाची हत्या केल्याची भयंकर घटना घडली असून संपूर्ण शहर हादरुन गेले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागले असून जुन्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे.शहरातील सिडको येथील शुभम पार्क परिसरात एका युवकाची घरातून बोलावून घेऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये सुमित देवरे (वय, 19) याचा मृत्यू झाला. सुमित सटाणा येथील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. सणाच्या दिवशीच शहरात भर रस्त्यात हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

जुन्या वादातून कुरापत काढून सुमित देवरे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता.  हल्ल्यानंतर सुमित देवरेला  तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

नक्की वाचा - Crime news: वर्षभरात 42 हत्या, 52 हाफ मर्डर,'या' जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस

दरम्यान,   सराईत गुंड अरुण वैरागर यांच्या सह अन्य दोन ,तीन संशयतांनी केली सुमित देवरेची हत्या प्राथमिक माहिती पोलिसांसमोर येत आहेत या घटनेविषयी अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित सोबत वैरागराचे जुने वाद असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना आढळून आले मात्र वादाचे नेमके कारण काय अद्याप स्पष्ट झाली  नाही. पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

Advertisement