Nashik Digital Arrest: 'सुप्रीम कोर्टात हजर व्हा अन्यथा..', एका कॉलने आयुष्य उद्ध्वस्त, कोट्यवधींची लूट

सायबर पोलिस ठाण्यात दोन्ही प्रकरणांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.पहिल्या घटनेत ७४ वर्षीय वृद्धाची ७२ लाखांची लूट करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नाशिक : राज्यभरात डिजिटल हाऊस अरेस्टच्या गुन्ह्यांची संख्या वाढत असताना, नाशिकमध्ये एका नव्या पद्धतीचा सायबर गुन्हा घडला आहे. यात सायबर गुन्हेगारांनी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नावाने फेक न्यायालय तयार करून दोन ज्येष्ठ नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले आणि तब्बल ७ कोटी ८० लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत.

या दोन घटनांमध्ये गुन्हेगारांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई स्वतः न्यायालयात हजर असल्याचे भासवले. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचा पोलीसांना संशय आहे. सायबर पोलिस ठाण्यात दोन्ही प्रकरणांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.पहिल्या घटनेत ७४ वर्षीय वृद्धाची ७२ लाखांची लूट करण्यात आली आहे.

High Court on Potholes Deaths : खड्ड्यांमुळे मृत्यू, वारसांना मिळणार मोठी रक्कम; उच्च न्यायालयाचे आदेश

 गुन्हेगारांनी पीडिताच्या आधार कार्डला जोडलेल्या क्रेडिट कार्डद्वारे मनी लाँड्रिंग आणि गैरव्यवहार झाल्याचा खोटा आरोप करून धमकावले. "७२ लाख रुपयांचा दंड भरला नाही तर सीबीआयचे पथक अटक करेल," असे सांगून ७४ वर्षीय वृद्ध व्यक्तीला लुटण्यात आले. यात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करण्यात आली. तर दुसरी घटनाही धक्कादायक असून वृद्ध महिलेचे ६ कोटींना गंडा घालण्यात आला आहे. 

या प्रकरणात, गुन्हेगारांनी सिम कार्डच्या माध्यमातून अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याचे भासवले. यामुळे भीतीभीत झालेल्या एका वृद्ध महिलेला ६ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. यातही न्यायालयीन प्रक्रियेच्या बहाण्याने रक्कम वसूल करण्यात आली. या गुन्ह्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीसांनी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला असून, संशयास्पद कॉल्स किंवा मेसेजेसची माहिती तात्काळ सायबर पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. तपासातून आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

Cough Syrup: भारतातील 3 कफ सिरपवर WHO चा इशारा; 22 बालकांच्या मृत्यूनंतर दखल

Topics mentioned in this article