किशोर बेलसारे, नाशिक: पगारामध्ये 50 रुपये जास्त आल्याच्या किरकोळ कारणावरुन दोन कामगारांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की एकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी संशयितास ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काल सकाळी एका परप्रांतीय इसमाचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. शांतीलाल ब्राह्मणे असे मृताचे नाव असून पोलिसांनी अधिकचा तपास केल्या असता आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत डोक्यात दगड टाकून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
विशेष बाब म्हणजे हे दोघेजण एकाच ठिकाणी काम करणारे मित्र होते. ज्या ठिकाणी हे दोघं काम करत होते यातल्या एका जनाला दोनशे रुपये पगार होता तर दुसऱ्याला दीडशे रुपये पगार होता. या दोघांमध्ये या पगारावरून वाद झाला आणि तुला दोनशे रुपये पगार कसा आणि मला 150 रुपये कसा असा प्रश्न विचारात दोघांमध्ये झटापटी झाली अवघे पन्नास रुपये जास्त असल्याने यात मयताचा खून झाला. याप्रकरणी एकाला पंचवटी पोलिसांनी ताब्यात अटक करण्यात आले असून संतोष अहिरे असे संशयित ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे.
नक्की वाचा - Sharad Pawar: एकनाथ शिंदेंचे कौतूक करताना शरद पवारांची गुगली, मात्र दिल्लीतलं वातावरण तापलं
दुसरीकडे, गंगापूररोड परिसरात रविवारी रात्री मद्यधुंद युवती व युवकांनी धिंगाणा घालत पोलिसांना अरेरावी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी त्या युवतीसह हॉटेल चालक बाउन्सर आणि 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणावरून मध्यधुंद युवकांचा व्हायरल व्हिडिओने शहर पोलिसांची चांगलीच बदनामी झाल्याने गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची तडका फडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.