प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
नाशिकच्या (Nashik Accident) दिंडोरी-वणी रस्त्यावर रात्री 12 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघाताबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येथे झालेल्या अल्टो आणि दुचाकीच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातील दुचाकी आणि अल्टो कारची धडक झाल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान या प्रकरणात अपघाताचं (Alto car accident) नेमकं कारण समोर आलं आहे.
रात्री साधारण अकराच्या सुमारास अल्टो कारचं पुढील उजव्या बाजूचं टायर फुटलं होतं. त्यानंतर कारचे एक्स्लेटर ब्रेकच्या खाली गेले. त्यामुळे गाडीचा ब्रेक लागला नसावा आणि गाडी नियंत्रणाबाहेर गेली, त्यातून हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गाडीचा ब्रेक न लागल्याने कार थेट शेजारच्या नाल्यात पलटली. गाडी सेंटर लॉक झाली होती. त्यामुळे प्रवाशांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. ही कार जवळपास १५ ते २० मिनिटं नाल्यात होती. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - Nagpur Jail : नातेवाईकांनी बोलणं टाळलं, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने अंडरवेअरने स्वत:ला संपवलं
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर वनी नाशिक रोडवर अल्टो गाडी क्रमांक mh 04 dy 6642 व एका मोटर सायकलचा अपघात झाला. या अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेला नाल्यामध्ये पलटी झाली. या अपघातात आल्टो गाडीमधील 1)देविदास पंडित गांगुर्डे, वय -28, 2) मनीषा देविदास गांगुर्डे, वय -23 वर्षे, 3)उत्तम एकनाथ जाधव, वय - 42 वर्षे, 4) अल्का उत्तम जाधव, वय - 38 वर्षे, 5)दत्तात्रेय नामदेव वाघमारे, वय - 45 वर्षे, 6)अनुसया दत्तात्रय वाघमारे, वय - 40 वर्षे, 7)भावेश देविदास गांगुर्डे, वय - 02 अशी मृतांची नावं आहेत. तर मोटर सायकलवरील तरुण मंगेश यशवंत कुरघडे वय-25, 2) अजय जगन्नाथ गोंद वय -18 वर्षे जखमी झाले असून पुढील उपचारासाठी सिविल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अल्टो कारचे पुढील उजव्या बाजूचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. ही कार तब्बल 15 वर्षे जुनी असल्याची माहिती आहे. टायर फुटल्यानंतर कारचे एक्स्लेटर ब्रेकच्या खाली गेले असावे. गाडी नाल्यातून बाहेर काढल्यानंतर एक्स्लेटर ब्रेकच्या खाली गेल्याचं दिसत आहे. त्यामुळे गाडीचा ब्रेक लागला नसावा आणि गाडी नियंत्रणा बाहेर गेली असा संशय आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटं कार नाल्यात होती, गाडी सेंटर लॉक झाली होती, प्रवाशांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाला. प्रथमदर्शनीच्या म्हणण्यानुसार नाल्यात गाडी पडली तेव्हा चारही टायर वरती होते, गाडीची काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.