Nashik News : नाशिकचा आरोपी कॅप्टन अशोक खरात आणि त्याच्या साम्राज्याचे धक्कादायक पैलू एकामागून एक समोर येत आहेत. केवळ अंधश्रद्धा आणि फसवणूकच नाही, तर स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकारही उघड होत आहेत.
कोपरगाव तालुक्यातील मढी येथे खरातच्या निकटवर्तीय हस्तकांनी खरातच्या राजकीय प्रभावाचा वापर करत शेतकरी नारायण आभाळे यांचा शेताकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता अडवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. परिणामी, गेल्या तब्बल दोन वर्षांपासून त्या शेतकऱ्याची ऊसतोडच होऊ शकलेली नाही.
खरातच्या हस्तकांचे धाबे दणाणले...
इतकंच नाही तर ऊस तोडणीचा हंगाम आला तरी खरातच्या माध्यमातून कारखाना प्रशासनावर दबाव आणत काम रोखलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यानं केला आहे. या सततच्या त्रासामुळे संबंधित शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे. दरम्यान, अशोक खरातला अटक झाल्यानंतर आता त्याच्या हस्तकांचेही धाबे दणाणले असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world