सुनील दवंगे, प्रतिनिधी
Ashok Kharat Viral Videos : महिलांचं लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशातच खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान,या प्रकरणातील पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राहुल गंगाधर शिंदे आणि योगेश पंढरीनाथ आढाव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर बीड येथील संदिप गर्जे याचाही या प्रकरणात समावेश असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. प्राथमिक तपासात उघडकीस आलं की, हे व्हिडिओ बीड येथून व्हायरल झाल्याचे समोर आलं असून कोपरगावमधील आरोपींनी ते सोशल मीडियावर शेअर करत मित्रांनाही पाठवल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता म्हणजेच (BNS) च्या कलम 294(2),3(5)तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 67अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात खळबळ, रिच फिल स्पा सेंटरवर छापा टाकताच पोलिसही हादरले, आतमध्ये सुरु होता भयंकर प्रकार
राष्ट्रवादीच्या नेत्याची खळबळजनक प्रतिक्रिया
भोंदू अशोक खरातचा खून करून संभाजी भिडे यांना पुरावा नष्ट करायचा आहे काय?कायदा नावाचा प्रकार असतो हे अशांना माहीत नाही का? कुणीही उठावं आणि याला मारा त्याला मारा असं सांगून पुरावे नष्ट करण्याची भाषा करावी यात राज्यात कायद्याचे राज्य नाही असे सिद्ध होईल.मी खरात याला एपस्टीनप्रमाणे मारून टाकले जाईल अशी शंका सर्वप्रथम व्यक्त केली होती.ती खरी ठरविण्याची ही सुरुवात आहे",अशी मोठी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) प्रवक्ते आणि प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
नक्की वाचा >>Mumbai News: पश्चिम रेल्वे विस्कळीत! विरार–वैतरणा दरम्यान भीषण अपघात; डाऊन मार्ग ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world