Nashik : पत्नीने कुऱ्हाडीनं वार करत केली पतीची हत्या, 2 महिने लपवला मृतदेह! नाशिक जिल्हा हादरला

Nashik News : पत्नीनेच पतीची कु-हाडीने निर्घृण हत्या करून मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

निलेश वाघ, प्रतिनिधी

पत्नीनेच पतीची कु-हाडीने निर्घृण हत्या करून मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील खुंटविहिर जवळच्या मालगोंदा गावातील ही घटना आहे. या प्रकारामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

यशवंत मोहन ठाकरे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला अटक केली आहे. तिने हत्या केल्याची कबुली दिली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने हत्येचे गूढ आणखी वाढले आहे

यशवंत 14 एप्रिल 2025 पासून घरातून बेपत्ता होता. दोन महिने उलटूनही यशवंत घरी न  परतल्याने आई - वडिलांनी पत्नी प्रभाकडे विचारणा केली असता यशवंत गुजरात राज्यातील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेल्याचे सांगितले.मात्र पाऊस पडून मुलगा घरी आला नाही त्यामुळं आई -  वडिलांची चिंता आणखीनच वाढली. त्यांनी पुन्हा प्रभाकडे  विचारपूस  केली असता तिने उडवा उडवीचे उत्तरे  दिले. प्रभा पतीला शोधण्याचे प्रयत्न करत नसल्याने यशवंतच्या कुटुंबियांना पत्नी प्रभाबद्दल संशय आला. त्यातच घराच्या ओसरी  खड्डा करून शेणा मातीने सारवलेला  दिसला.त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे सुनेची  तक्रार दाखल केली.

( नक्की वाचा : Beed Crime : बीडची सोनम! विवाहित महिलेच्या माहेरच्यांनी नवऱ्यावर केला हल्ला, हात-पाय मोडले! )
 

या तक्रारीनंतर पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभाला सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी पंचनामा करीत महसूल विभागाला समवेत घरातील ओसरीवरील खड्डा खोदकाम केले मात्र प्रेत आढळून आले नाही. प्रभा सर्व आरोप फेटाळत काहीच झाले नाही, या थाटात वावरत होते. 

Advertisement

आणि लागला छडा....

दोन दिवसांनी यशवंतचा भाऊ उत्तमची पत्नी मेथू प्रभाच्या घरी आली. त्यावेळी .दारात पडलेल्या यशवंतची चप्पल पत्नी प्रभावाने मांडीखाली लपवून बसली होती.त्यामुळे तिला संशय आला.तिने ही बाब त्याच्या पती उत्तमला  सांगितली. उत्तमने तपास केल्यानंतर मयत यशवंतच्या घराच्या दक्षिणेस असलेल्या पडक्या शौचालयाचा शोषखड्डाजवळ कुजलेला वास येत होता तर  माश्याही घोंगावत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने खड्डयातील माती उकरुन पहिली असता त्या ठिकाणी त्याला प्रेत असल्याचे आढळले.त्याने तातडीने पोलिसांना कळविले

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खड्ड्यातून यशवंतचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.पोलिसांनी तातडीने मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला असता आपणच     कु-हाडीने वार करून हत्या केली.तसंच शरीराचे मान, धड, हातपाय असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून पुरून टाकले. वास येऊ नये म्हणून औषधे टाकल्याची कबुली तिने दिली. मयत यशवंतच्या पाठीमागे मुलगा, आई ,वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

Advertisement
Topics mentioned in this article