साधूच्या वेशात आलेल्या तीन जणांनी एका महिलेला लुटण्याची भयंकर घटना घडली आहे. ही घटना नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरात घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. साधूच्या वेशात हे भामटे त्या महिलेच्या घरी आले होते. त्यानंतर त्यांनी तिच्याकडे भिक्षा मागितली. तिनेही ती दिली. पण त्याच वेळी त्यांनी तिला भूल घातली. त्यानंतर घरात असलेल्या कॅशवर त्यांनी डल्ला मारला. तिला शुद्ध आली त्यावेळी ते सर्व काही घेवून पसार झाले होते.
नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्कमधील श्रीकृष्ण मंदिराच्या पाठीमागील गल्लीत 10 ऑगस्ट रोजी हा संपूर्ण प्रकार घडला. साधूंच्या वेशात आलेल्या तीन भामट्यांनी महिलेला भूल घातली. त्यानंतर तिच्याकडचा तब्बल 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. साधूच्या वेशात तिघे जण भिक्षा मागण्याच्या बहाण्याने या महिलेपर्यंत पोहोचले. त्यांनी तिच्याकडे भिक्षा मागितली. त्यावर त्या महिलेने त्यांना घरातून पैसे आणू दिले.
नक्की वाचा - Nashik News: घरांना हादरे बसले, काचा फुटल्या; नाशिककरांमध्ये घबराट, नेमकं काय घडलं?
आधी तिने त्यांना 500 रुपये दिले. त्यानंतर त्यांची मागणी वाढवी. ते म्हणाले की एक किलो तूप आणा, बरं ते ऐवढ्यावर थांबले नाहीत. त्यानंतर त्यांनी चहाची ही मागणी केली. याच वेळी त्यांनी डाव साधला. त्यांनी महिलेच्या हातावर ‘रक्षा' ठेवली. त्यावेळी त्यांनी भूल दिली. भूल दिल्यानंतर त्यांनी त्या महिलेच्या घरातले 20 हजार रूपये चोरले. त्यानंतर ते तिथून पसार झाले. महिलेला शुद्ध आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे जाणवले.
Parbhani News : भूकंप, ज्वालामुखी की आणखी काही, परभणीतल्या शेतातून वाफ येण्याचं कारण समजलं!
या घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीने तातडीने एमआयडीसी चुंचाळे पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर गुन्हा ही दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनोळखी व्यक्तींना अशा पद्धतीने कुणीही थेट घरात घेवू नका असे आवाहन ही या निमित्ताने करण्यात येत आहे.