राहुल वाघ, प्रतिनिधी
Nashik Crime News : नाशिक शहरात खळबळजनक घटना घडली आहे. खासगी वसतिगृहात राहणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अंजली कैलास बागुल असं मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. ती संदीप फाऊंडेशनमध्ये शिक्षण घेत होती. अंजलीनं जीवन संपवल्यानं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खोलीत स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतला
मिळालेल्या माहितीनुसार,अंजलीने वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील तिच्या खोलीत स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गळफास घेतलेल्या अंजलीला खाली उतरवण्यात आलं.
नक्की वाचा >> Jalgaon News: 408 बँक खाते, भुसावळच्या तरुणाच्या खात्यावर 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम, देशातील मोठं रॅकेट उघड
अंजलीने टोकाचं पाऊल का उचललं?
परंतु,रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अंजलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अंजलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.